Don't play with the sentiments of farmers, they have power to topple the government.
Don't play with the sentiments of farmers, they have power to topple the government. Agrowon
ॲग्रो विशेष

शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ नको; के.चंद्रशेखर राव

Team Agrowon

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. शेतकरी संतापला की सत्ता बदल होतो, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे केंद्राने इतर राज्यांप्रमाणेच तेलंगणातील भातपिकाचीही (Paddy) हमीभावाने (MSP) खरेदी करावी, अशा शब्दांत तेलंगणाचे मुख्यमंत्री व तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे.

रब्बी हंगामातील भातपिकाच्या खरेदीच्या मुद्यावरून टीआरएसने सोमवारी (दिनांक ११ एप्रिल) दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. येत्या २४ तासांत मोदी सरकारने आमची मागणी मान्य करावी अन्यथा देशभरात शेतकरी आंदोलन करू, असा इशाराही राव यांनी दिला आहे.

राज्यात आजमितीस १५ लाख टन परबॉइल्ड राईस खरेदीशिवाय पडून आहे. भातपिकाच्या खरेदीवरून केंद्र सरकारने नेहमीच संभ्रमाची भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने भातपिकाऐवजी अन्य पिकांकडे वळण्याचे आव्हान केले. म्हणूनच शेतकऱ्यांनी इतर पिकांचा विचार केला. तर आता केंद्रीय मंत्री राज्यातल्या शेतकऱ्यांना भातपिकाची लागवड करायचा सल्ला देऊन त्याच्या खरेदीचा आग्रह राज्य सरकाराकडे धरत असल्याचा आरोप राव यांनी केला आहे.

आम्ही पहिल्यापासून या मुद्यावर केंद्र सरकारशी संवाद साधला. वेळोवेळी केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना हा मुद्दा समजावून सांगितला आहे. तरीही आम्ही पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली नसल्याचा आरोप केला जात आहे, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मुद्यावर गंभीर नसल्याचे हे लक्षण असल्याचा आरोपही राव यांनी केला आहे.

केंद्र सरकारला कृषी (Agriculture) क्षेत्र कार्पोरेट्सच्या घशात घालायचे आहे, भाजपशासित राज्य केंद्राला या षडयंत्रात सहकार्य करत आहेत. जी राज्ये केंद्र सरकारच्या या मनमानी कारभाराविरोधात उभी रहातात, आवाज उठवतात त्यांच्याविरोधात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा घणाघाती आरोपही राव यांनी केला आहे.

आमचे पंतप्रधान दिलगिरी व्यक्त करण्यात माहीर आहेत, निवडणुका जवळ आल्या की ते लगेच दिलगिरी व्यक्त करतात. पाच राज्यांच्या निवडणुका आल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यांच्यापुढेही निवडणुका आल्यावरच त्यांना आपल्या निर्णयात चुकांची जाणीव होत असल्याचे राव यांनी नमूद केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT