Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Doctor : अहिल्यानगरला ‘कृषी’ची ‘शेतीचा डाॅक्टर’ संकल्पना

Agriculture Department : शेतकऱ्यांच्या पिकांबाबत समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना, विविध शिफारसी देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या संकल्पनेतून ‘शेतीचा डाॅक्टर’ उपक्रम सुरू केला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilynagar News : शेतकऱ्यांच्या पिकांबाबत समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना, विविध शिफारसी देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या संकल्पनेतून ‘शेतीचा डाॅक्टर’ उपक्रम सुरू केला आहे.

कृषी विभागाने डाॅक्टरांप्रमाणेच प्रिस्क्रिप्शन छापल्या असून त्यावर कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडल कृषी अधिकारी यांच्याकडून समस्या समजून त्यावर उपायांबाबत सल्ले, शिफारसी लिहून दिल्या जात आहेत. राज्यात पहिल्यांदाच अहिल्यानगरला सुरू झालेल्या या उपक्रमाला शेतकरी प्रतिसाद देत आहे.

खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. अशा वेळी वेगवेगळ्या पिकांवर रोगांचा प्रादर्भाव होतो. त्या वेळी त्यावर मात कशी करायची, रोगांचा प्रादुर्भाव कसा रोखायचा याबाबत शेतकऱ्यांना पुरेसी माहिती मिळत नाही.

त्यामुळे शेतकरी निविष्ठा, खते, कीटकनाशके विक्रेत्यांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने खते, कीटकनाशके खरेदी करतात. जास्तीची अनावश्यक कीटकनाशके, खते व अन्य बाबी शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात असल्याचा आणि त्यातून बोगस खते, फवारणी औषधी विक्रीतून नुकसान झाल्याचे अनेक अनुभव आहेत.

यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे थेट बांधावर जाऊन पिकांवरील रोग व अन्य अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्यासाठी बोराळे यांच्या पुढाकाराने ‘शेतीचा डाॅक्टर’ हा उपक्रम सुरू केला आहे.

शेतकऱ्यांचा बियाणे, खते, कीटकनाशके आदी बाबींवर होणारा खर्च कमी करण्यासाठी तसेच अनावश्यक औषधांचा वापर टाळण्यासाठी ‘शेतीचा डाॅकटर’ उपक्रम सुरू करण्याचा प्रयोग केला. नेमक्या कीटकनाशकांचा, फवारणी, खतांचा वापर करत अन्य बाबी समजून घेण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT