ZP Washim Agrowon
ॲग्रो विशेष

ZP Washim : कार्यालयात हुजरेगिरी नको, त्यापेक्षा कामाला न्याय द्या

Vaibhav Waghmare : ‘मला, जी हुजूरी करणारे नाही तर कामाला प्राधान्य देणारे अधिकारी- कर्मचारी आवडतात,’ असे स्पष्ट मत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी व्यक्त करीत आपल्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचाऱ्यांना फर्मान दिले.

Team Agrowon

Washim News : ‘मला, जी हुजूरी करणारे नाही तर कामाला प्राधान्य देणारे अधिकारी- कर्मचारी आवडतात,’ असे स्पष्ट मत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी व्यक्त करीत आपल्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचाऱ्यांना फर्मान दिले. जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि सुरळीत चालण्याच्या दृष्टीने वाघमारे बैठक घेऊन मुख्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

या वेळी त्यांनी वेळेचे बंधन पाळणे, कार्यालयीन शिस्तीबाबतचे नियम, चांगले अधिकारी- कर्मचारी कोण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेमध्ये काम करताना ओळख अथवा हितसंबंध न पाहता कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला.

संबंध जोपासण्यासाठी काम करू नका, काम करून संबंध जोपासा. ज्या कामाचा आपल्याला पगार मिळतो, मानसन्मान मिळतो त्याचे स्मरण करून आणि पगाराला अनुसरून काम करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद हे आपले कुटुंब असून एकत्र काम (टीम वर्क) करणे, येणाऱ्या सुख- दु:खाची बाहेर वाच्यता न करता ते एकत्र सोसणे हे चांगल्या कुटुंबाचे लक्षण असल्याचे ते म्हणाले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी पावणे दहा वाजेच्या आत प्रवेश करणे बंधनकारक राहील. अपवादात्मक परिस्थितीत कार्यालयात येण्यास विलंब होणार असल्यास साडेनऊ वाजण्यापूर्वी विभाग प्रमुखांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना व अधिकारी कर्मचारी यांनी जि. प. मुख्यालय या व्हॉट्सॲप ग्रुपवर ‍कारणांसह कळवावे. कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, केलेली कारवाई माघारी घेणार नाही असेही वाघमारे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: कर्जाचा भस्मासुर झटपट श्रीमंतीचे मृगजळ

Flower Farming : शेतकऱ्यांनो, फुलशेतीतून मिळवा वर्षभर हमखास उत्पन्न; जाधव यांनी मांडले यशाचे गणित!

CM Relief Fund : सामाजिक बांधिलकी! ‘छत्रपती शाहू शिक्षण’ संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ लाखांची मदत

Rabi Sowing : पेरणीचा वेग वाढला! रब्बीची तब्बल ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण

Flower Drop Problem: सोलापूर जिल्ह्याती द्राक्ष बागांना फुलगळ अन्‌ कुजीचा फटका!

SCROLL FOR NEXT