Diwali Agrowon
ॲग्रो विशेष

Diwali Festival : ‘दिवाळी’चा राज्यभर उत्साह

Diwali 2024 : देशासह राज्यभरात दिवाळीच्या चैतन्यदायी पर्वानिमित्त सर्वत्र उत्साह आहे. मोठ्या शहरांपासून गावखेड्यापर्यंत बाजारपेठा गजबजल्या आहेत.

Team Agrowon

Pune News : देशासह राज्यभरात दिवाळीच्या चैतन्यदायी पर्वानिमित्त सर्वत्र उत्साह आहे. मोठ्या शहरांपासून गावखेड्यापर्यंत बाजारपेठा गजबजल्या आहेत. लांबलेली खरीप काढणी, होऊ घातलेली रब्बी पेरणी एकाच टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांची अजूनही शिवारातच लगबग सुरू आहे. पावसाने पिकांचे नुकसान केले असले, तरी जे हाती येईल, त्यास चांगला भाव मिळावा या अपेक्षेत बळिराजा आहे.

यंदा मॉन्सूनच्या दमदार पाऊसमानामुळे समाधान व्यक्त होत आहे. जेथे पावसाचा फटका बसला नाही, त्या भागात खरीप पिकांचे चांगल्या उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना आहे.

दिवाळीच्या निमित्ताने काही भागात विशेषतः फूल उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि दर मिळत आहे. भाजीपाला, फळभाज्यांना समाधानकारक दर असला, तरी पावसामुळे कमी उत्पादन घटीचे मुख्य कारण त्यामागे आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर कपडे, सोने, वाहने, धार्मिक पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांत ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ग्राहकांनी दुकाने गजबजली आहेत. वर्षभराच्या नोंदीसाठी व्यापाऱ्यांना लागणाऱ्या चोपड्या, पूजेसाठी फुले, उसाचे धाट, केळीचे खुंट, लक्ष्मीची प्रतिमा-पावले आदी पूजेचे साहित्य खरेदी करत लक्ष्मी पूजन, पाडवा सणासाठी नागरिकांसह व्यापारी, संस्था, कंपन्या सज्ज झाल्या आहेत.

वाहन खरेदीसाठी देखील दुचाकी, चारचाकींसह ट्रॅक्टर, अवजारे खरेदीसाठी देखील बाजारपेठेत उत्साह आहे. दिवाळ फराळाचे काम संपले असून, सणाचा गोडवा या चवदार पदार्थांनी वाढवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Development : ग्रामविकासाची ध्येय निश्‍चिती...

Maharashtra Assembly Election 2024 : भावी आमदारांचे भवितव्य नवमतदारांच्या हाती; १८ ते १९ वयोगटातील २२ लाख मतदार

Animal Husbandry : पशुपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

Agriculture Warehouse : गोदाम उभारणी करतानाचे नियोजन

Child development : ये हृदयीचे ते हृदयी घातले

SCROLL FOR NEXT