New Tehsil Office Nagar Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Tehsil Office : नगर तालुका तहसील कार्यालयाचे विभाजन

Division Of Tehsil : नगर तालुका तहसील कार्यालयावर येणारा कामाचा ताण पाहता तालुका तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर तालुका तहसील कार्यालयावर येणारा कामाचा ताण पाहता तालुका तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यात आले आहे. नगर तालुक्यासाठी वेगळे तहसीलदार व शहरासाठी स्वतंत्र अतिरिक्त तहसीलदार असणार आहेत. शासनाने गुरुवारी (ता.१९) याबाबत अध्यादेश काढला. नेवाशा तालुक्याचे विभाजन करण्याची मागणी आहे, मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही.

नगर शहर हे नगर तालुका तहसीलदार कार्यालयाअंतर्गत येत होते. नगर शहरातील वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण व तालुक्यातील रहिवास क्षेत्राचा झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे नगर तहसील कार्यालयावर कामाचा मोठा ताण पडत होता. प्रशासकीय सोयीसाठी नगर तालुका आणि अहमदनगर शहर अतिरिक्त तहसील कार्यालय असे विभाजन करण्याचा प्रस्ताव होता.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेवासा तालुक्याचेही विभाजन करा अशी मागणी होती. प्रशासकीय पातळीवर ३० डिसेंबर २०२० रोजी विभाजनासाठीचा अहवाल मागविण्यात आला. या संदर्भात मंत्रालयात सोमवारी (ता.१६) बैठक झाली. या बैठकीत नगर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यावर काही दिवसांपूर्वी चर्चा करून आढावा झाल्यानंतर गुरुवारी (ता.१९) राज्याचे उपसचिव संतोष गावडे यांनी याबाबतचा अध्यादेश काढला आहे.

अहमदनगर शहरासाठी अतिरिक्त तहसीलदार हे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी एक महसूल सहायक (लिपिक) पद निर्माण करण्यात आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १३ च्या पोट-कलम (३) नुसार, अतिरिक्त तहसीलदारांना (अहमदनगर शहर) सर्व अधिकार हे कार्यक्षेत्रासाठी राहणार आहेत.

नगर शहरातील मंडले

नगर शहरासाठी असलेल्या अतिरिक्त तहसीलदारांकडे ५ महसूल मंडले आणि १२ गावांचा समावेश राहणार आहे. नालेगाव (५ गावे), सावेडी (२ गावे), केडगाव, भिंगारचा ही मंडले असतील.

नगर तालुका तहसीलकडील मंडले

नगर तहसील कार्यालयाकडे ११ मंडले आणि १०९ गावे असणार आहेत. त्यात नालेगाव (३ गावे), सावेडी (२ गावे), कापूरवाडी (९ गावे), केडगाव (८ गावे), भिंगार (१४ गावे), नागापूर (१२ गावे), जेऊर (१२ गावे), चिचोंडी पाटील (१३), वाळकी (१० गावे), चास (१३ गावे), रुईछत्तीसी (१३) या मंडळाचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT