Agricultural Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Festival : जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उद्‌घाटन

Festival Inauguration : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि ‘सकाळ-अॅग्रोवन’ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. १०) छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि ‘सकाळ-अॅग्रोवन’ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. १०) छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, आत्माच्या प्रकल्प संचालक धनश्री जाधव आदींसह छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री आदी तालुक्यांतील आत्मा कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

या कृषी व धान्य महोत्सवामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, पंतप्रधान अन्न प्रक्रिया सूक्ष्म उद्योगअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी आदीचे मिळून ४० दालने थाटण्यात आली आहेत. विविध प्रकारची अन्नधान्ये, प्रक्रिया उत्पादनांची रेलचेल या ठिकाणी आहे.

या प्रदर्शनास विविध मान्यवरांनीही शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या दालनास भेट देऊन माहिती घेतली. छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी या प्रदर्शनात भेट देऊन शेतीमालाची खरेदी करावी, असे आवाहन आत्माच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sachin Ahir: सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडली; शिंदेंच्या सेनेकडून उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

Agriculture Advisory: मातीचे आरोग्य, कीटकनाशकांच्या संतुलीत वापराबद्दल मार्गदर्शन

Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची मशागतीला साथ!

Cotton Seed Distribution: ‘कापूस उत्पादकता’अंतर्गत घुसर येथे शेतकऱ्यांना बियाणे वाटप

Farm Road Issue: पहिल्याच पावसात शेतकऱ्यांची वाट बिकट

SCROLL FOR NEXT