Distribution of Tents and Solar Lights Agrowon
ॲग्रो विशेष

Protection from Leopards : बिबट्यांपासून संरक्षणासाठी मेंढपाळांना सौर दिवे, तंबूंचे वाटप

Distribution of Tents and Solar Lights : मानव बिबट्या संघर्ष कमी करण्याबरोबरच जीवितहानी टाळण्यासाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने मेंढपाळांना तंबू आणि सौर दिव्याचे वाटप करण्यात आले आहे.

गणेश कोरे

Pune News : मानव बिबट्या संघर्ष कमी करण्याबरोबरच जीवितहानी टाळण्यासाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने मेंढपाळांना तंबू आणि सौर दिव्याचे वाटप करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ६) उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते नगदवाडी येथे साहित्याचे वाटप करण्यात आले.

ऊस तोडणी हंगाम सुरू झाला असून, ऊस तोडणीनंतर निवारा संपल्यामुळे उसातील बिबटे सैरभैर होऊन मानवी वस्तीत येऊन, शेतकरी बिबट्या संघर्ष वाढत आहे. या संघर्षात लहान, मुले, प्रौढ, महिला, पशुधनांचा बळी जात आहे. हे बळी रोखण्यासाठी विविध खबरदारी आणि उपाययोजना वन विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे.

यामध्ये मेंढपाळांसाठी ४०० सौर दिवे आणि ४०० तंबू खरेदी केले असून, मेंढपाळांना याचे वाटप करण्यात येत आहे. सर्व तंबू आणि सौर दिवे उपलब्ध झाले असून, टप्प्याटप्प्याने या साहित्याचे वाटप केले जाणार असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी यावेळी सांगितले. सौर दिवे आणि तंबूमुळे बिबट हल्ला, सर्पदंश, तसेच पाऊस व थंडी यापासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होईल असे ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी सांगितले.

सौरदिवा कशा प्रकारे वापरावा तसेच तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल याचे प्रात्यक्षिक वनरक्षक कैलास भालेराव, विशाल गुंड, वनपाल संतोष साळुंके यांनी करून दाखवले. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर, रेस्क्यू टीमचे सदस्य संतोष कुतळ, रोशन भोर, रवी केदार, खंडू वामन आदी उपस्थित होते.

आळे, पिपंरी पेंढार, उंब्रज, वडगांव आनंद, बेल्हे, निमगाव सावा, मंगरूळ, पारगाव तर्फे आळे, शिरोली तर्फे आळे, सुलतानपूर, येडगाव, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, वडगाव कांदळी,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT