Kolhapur Fertilizer Shortage agrowon
ॲग्रो विशेष

DAP Fertilizer : धर्माबाद तालुक्याला शंभर टन डीएपीचे वितरण

Fertilizer Shortage : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून डिएपी खताची मागणी वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यात या खताची टंचाई जाणवत आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्हा प्रशासनाने ५५० टन डिएपीचा संरक्षीत साठा (बफर स्टॉक) खुला केला आहे. जिल्ह्यातील सोळा तालुक्यांना एमएआयडीसी व डिएमओंच्या माध्यमातून या खताचे विरतण करण्यात आले आहे. यात धर्माबाद तालुक्याला सर्वाधीक शंभर टन तर बिलोली तालुक्यात दहा टन डिएपी वितरीत केला आहे.

आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून डिएपी खताची मागणी वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यात या खताची टंचाई जाणवत आहे. शेतकरी खरिपासाठी खते तसेच बियाणांची खरेदी करत आहेत. परंतु अनेक कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर डीएपी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना माघारी फिरावे लागत आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी तालुका तसेच जिल्हास्तरावर शासकीय कार्यालय गाठून डीएपी उपलब्ध करुन देण्याची मागणी करत आहेत. यासोबतच राजकीय पदाधिकारी तसेच काही संघटनांनीही शेतकऱ्यांना डीएपी खत उपलब्ध करुण देण्याची मागणी केली होती. यामुळे जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडील २५५ टन तर जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडील २९५ टन असा एकूण ५५० टन डीएपी जिल्ह्यात वितरित करण्याचे निर्देश दिले होते.

यानुसार कृषी विभागाने तालुकानिहाय मागणीनुसार वितरण तयार करुन डिएपी खत खुला केला आहे. हा खत शेतकऱ्यांना लवकर उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. डिएपीच्या वितरणात धर्माबाद तालुक्याला तब्बल १०० टन खत खुला केला आहे. इतर १५ तालुक्यांना मात्र १० टन ते ५० टन या प्रमाणात वितरण केले आहे.

तालुकानिहाय डिएपी खताचे वितरण (वितरण टनांत)

अक्र, तालुका एमआयडीसी डिएमओ एकूण

१) धर्माबाद शून्य १०० १००

२) नायगाव ५० शून्य ५०

३) देगलूर ४० शून्य ४०

४) मुदखेड .१५ शून्य १५

५) किनवट २० शून्य २०

६) भोकर २० शून्य २०

७) उमरी २० २०

८) हदगाव २० शून्य २०

९) कंधार शून्य ३० ३०

१०) लोहा शून्य ४० ४०

११) मुखेड १५ २५ ४०

१२) बिलोली १० शून्य १०

१३) अर्धापूर २० १० ३०

१४) नांदेड शून्य ४० ४०

१५) माहूर शून्य १० १०

१६) हिमायतनगर १५ १० २५

एकूण २५५ २९५ ५५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT