Shantiganga Farmer Producer Company Agrowon
ॲग्रो विशेष

Drone Distribution : शेतकरी उत्पादक कंपनीला ड्रोनचे वितरण

Drone Sales : राज्यात महाएफपीसी प्रमोटर संस्था असलेल्या भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनची विक्री भंडारा येथील शांतीगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीला करण्यात आली.

Team Agrowon

Amravati News : राज्यात महाएफपीसी प्रमोटर संस्था असलेल्या भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनची विक्री भंडारा येथील शांतीगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीला करण्यात आली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजीत ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनात कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष हेमंत पिकलमुंडे यांना ड्रोन प्रदान करण्यात आला.

डिपार्टमेंट ऑफ सिव्हील ऍव्हीऐशन (डिजीसीए) मान्यता प्राप्त पहिला भारतीय बनावटीच्या ड्रोनचे उड्डाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रोन दिदी कार्यक्रमाअंतर्गत केले होते. या ड्रोनचे ॲग्रीबोट उत्पादक, ॲग्री डिवाईन ॲग्री प्रो. कंपनी हे वितरक तर राज्यात महाएफपीसी प्रमोटर संस्था आहे.

राज्य शासनाकडून अनुदानावर हे ड्रोन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील धोप येथील शांतीगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीला ड्रोनची विक्री करण्यात आली. कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष हेमंत पिकलमुंडे यांना ड्रोन प्रदान करण्यात आला.

या वेळी महाएफपीसीचे संचालक सुधीर इंगळे, कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, जयंत सवाई, अभिजित अहेर, राज ढोकणे, शैलेश देशमुख, एस. एस. इंगळे, सुमित इंगळे व शेतकरी उपस्थित होते.

अशी आहे क्षमता

दहा लिटर क्षमतेच्या या ड्रोनची किंमत साडेआठ लाख रुपये असून शासन योजनेतून ३५ टक्‍के अनुदान याकरिता आहे. सात मिनिटांत एक एकर फवारणी याव्दारे शक्‍य होते. या माध्यमातून फवारणीकामी कीटकनाशकासोबतच वेळेतही बचत होते. तीन वर्ष गॅरंटी तसेच दहा वर्ष वारंटी या संयंत्राची आहे, असे महाएफपीसीचे संचालक सुधीर इंगळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT