Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Loan : बँकांनी पीककर्ज मंजुरीला प्राधान्य द्यावे ः जिल्हाधिकारी

Kharif Season : चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर व आवश्यक प्रमाणात पीककर्ज उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Team Agrowon

Parbhani News : चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर व आवश्यक प्रमाणात पीककर्ज उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक बँकेने शाखांमधून शेतकऱ्यांची पीककर्ज प्रकरणे प्राधान्याने मंजूर करावीत. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते.

अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत असतात.त्यामुळे बँकांनी प्रत्येक गावात जाऊन पीककर्ज वाटपासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता.१२) पार पडलेल्या जिल्हास्तरीय बँकिंग समन्वय समितीच्या बैठकीत खरीप पीककर्ज वाटप, नोंदणीकृत शेतकरी, कर्ज पात्रता, आर्थिक समावेशनाबाबतस जिल्हाधिकारी गावडे यांनी आढावा घेतला.

यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक एस.के.नवसारे,आरबीआयचे (क्रेडीट अँड एनपीएचे) अभय वानखेडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एन.अकुलवार, राजेंद्र कानीशेट्टी, संजय भालेराव,सुनील दरेकर, सुनील हट्टेकर, आरसेटी’चे जितेंद्र कुशवाह,रमणकुमार सौदागर यांच्यासह बँकांचे अधिकारी,महामंडळांचे जिल्हा समन्वयक, विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.\

गावडे म्हणाले,गावनिहाय शिबिराबाबत शेतकऱ्यांना पूर्वीच कल्पना द्यावी.नियोजन करून प्रसिद्धी करावी.जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विनाविलंब,अडथळ्याशिवाय तत्काळ कर्ज देण्याची कार्यवाही पूर्ण करावी.

दर १५ दिवसाला बँक अधिकाऱ्यांसोबत आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.सर्व बँकांनी विहित कालमर्यादेत पीककर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्ण करणे ही प्राथमिक जबाबदारी असून तशी कार्यवाही तत्काळ करावी.

संबंधित बँकांनी या महिन्यातच आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करावीत. कर्ज वितरणातील प्रक्रिया अत्यंत कमी असलेल्या बँकांनी कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी गावडे यांनी दिले.यावेळी ‘आरसेटी’ने तयार केलेल्या वार्षिक कर्ज आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Aerogel: खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारा एअरोजेल विकसित

Cotton Farming: जमिनीची ताकद वाढवून कापूस उत्पादनवाढ

Indian Language: भाषा मरता देशही मरतो...

Cow Protection Chaos: गोरक्षकांचा धुडगूस शेतकऱ्यांच्या मुळावर

Shirala Nagpanchami: शिराळ्यात २३ वर्षांनंतर पुन्हा झाले जीवंत नागदर्शन

SCROLL FOR NEXT