Ajit pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Shasan Aplya Dari : भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवार यांच्या भाषणावेळी अचानक गोंधळ

Ajit Pawar Speech : भंडाऱ्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणादरम्यान गोंधळ सुरु झाला.

Swapnil Shinde

Bhandara News : सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण तापलेले असताना भंडाऱ्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना अचानक प्रेक्षकांमधून गोंधळ सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली.

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. गावागावांमध्ये लोकप्रतिनिधींना बंदी घालण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्यावतीने शासन आपल्या दारी कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली.

काही दिवसांच्या खंडानंतर आज भंडाऱ्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी हजेरी लावली.

कार्यक्रमादरम्यान, अजित पवार यांनी भाषणाला सुरुवात केली. ते सरकारच्या विविध योजनाची माहिती देत असताना अचानक काही तरुणांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आरक्षणाची मागणी पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, असी घोषणा देत हातातील बॅनर फडकावले .

कार्यक्रमात एकच गोंधळ झाल्याने पोलिसांनी तात्काळ संबंधितांना ताब्यात घेऊन बाहेर नेले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावाचे बघायला मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT