Hasan Mushrif VS Satej Patil  Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway Issue : ‘शक्तिपीठ’वरून मुश्रीफ सतेज पाटलांत जुंपली

Hasan Mushrif VS Satej Patil : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत आता शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत आता शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा चर्चेत आला आहे. या मुद्यावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यात जुंपली आहे.

आमदार पाटील यांनी शुक्रवारी (ता. २५) झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, शक्तिपीठ महामार्ग केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. तो केवळ कोल्हापूरपुरता रद्द करता येतो का? १५ ऑक्टोबरचा आदेश असताना तो २३ तारखेला का जाहीर केला. हा महामार्ग कोल्हापूरमधून गोव्याला जाणार आहे. तो मध्येच कसा रद्द होऊ शकतो. आचारसंहिता लागू असतानाही महायुतीकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.

शक्तिपीठ वर्ध्यातून कोल्हापूर-गोवा असा जाणार आहे. कोल्हापुरातील शक्तिपीठ रद्द झाला असेल तर तो मार्ग हवेतून गोव्यापर्यंत जाणार का? १५ ऑक्टोबरला हा मार्ग रद्द झाल्याची माहिती सांगितली जात असेल, तर तो आतापर्यंत जाहीर का केला नाही? असा सवाल केला. याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात त्यांनी श्री. पाटील यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

आमदार सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या नोटिफिकेशनवर त्यांच्या बालिश बुद्धीचे प्रदर्शन केले आहे. अशी बालिश व पोरकटपणाची वक्तव्ये करून त्यांनी लोकांच्यात विनाकारण संभ्रम निर्माण करू नये, अशी माझी त्यांना सूचना आहे, असेही श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

पाटील यांना आमदार आणि मंत्री म्हणून अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांनी त्याची शहानिशा करावी. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन प्रक्रियेचा तारखांसह तपशीलही त्यांना देऊ शकतो त्याचाही त्यांनी बारकाईने अभ्यास करावा. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द केलेले आहे, यापुढे तो कधीही होऊ देणार नाही, असे श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season 2024 : शिरोळ्यात १० हजार हेक्टरवरील रब्बी पेरण्या रखडल्या

Paddy Harvesting : पावसाची उघडीप; भातपीक कापणीला वेग

Supriya Sule : महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील

Crop Insurance : तीन हजार भात उत्पादकांनी नोंदविल्या नुकसानीच्या सूचना

Agrowon Podcast : ज्वारीचा बाजार दबावातच; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच काय आहेत आजचे आले दर?

SCROLL FOR NEXT