Chana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Disease : हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

Post Mansoon Rain : जाफराबाद तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी हरभरा पिकाला मर रोगाची लागण झाली आहे.

Team Agrowon

Jalna News : जाफराबाद तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी हरभरा पिकाला मर रोगाची लागण झाली आहे. शेतातील पीक अति पावसाने उबाळून येत आहे. या पिकाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी, कुंभारझरी, टेंभुर्णी, नांदखेडा, मेरखेडा, गोपी, सवासिनी, भारज, सिपोरा अंभोरा, देवलझरी, वरुड, कोनड, बोरगाव, डावरगाव सावंगी, पापळ, भातोडी, खानापूर, वरखेडा, अकोला देव या भागात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या शेतात पिकाची लागवड केली जाते.

यंदाही सोयाबीनचे पीक नुकसानग्रस्त झाल्याने शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करून हरभरा पिकाची पेरणी केली आहे.

जाफराबाद तालुक्यात रब्बीतील पेरणीचे क्षेत्र २८ हजार ३६४ हेक्टर आहे. यामध्ये हरभरा दहा हजार आठशे हेक्टरवर पेरला गेला आहे. रब्बीमध्ये सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची झाली. परंतु अवकाळी पावसाने अनेक शेतात पिके उबाळून आली आहेत.

यामुळे पिकांची वाढ खुंटली, मर रोगाची लागण झाली आहे. महागडी औषधी फवारूनही पिकाचे नुकसान थांबविता येत नसल्याचे ब्रह्मपुरी येथील शेतकरी नीलेश शेवत्रे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: केळीचे जिओ टॅगींग न केल्यास विमा योजनेतील सहभाग रद्द

Rabi Sowing: मराठवाड्यात आजवर ७० हजार हेक्टरवरच पेरणी

Mushroom Production: अळंबी उत्पादनातून महिला झाल्या सक्षम

Shetkari Karjmafi: कर्जमाफीच्या बैठकीत नक्की काय झाले?

Interview with Sambhaji Kadu Patil: व्हीएसआय म्हणजे साखर उद्योगाचे प्रभावी संजीवक

SCROLL FOR NEXT