Grape Disease Management Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Disease : द्राक्ष मण्यांवर रोगांचा प्रादुर्भाव

Crop Damage : मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका द्राक्ष बागेला बसला असून पन्नास टक्के नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Sangli News : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सलग झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्ष बागा संकटात आहेत. परंतु बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष बागेला बसू लागला आहे. सध्या ज्या बागा ७० ते ९० दिवसांच्या पुढे आहेत. त्या बागांवर रोगांचा फैलाव जोरदार सुरू आहे. वेलीवरच घड कुजू लागल्याचे विदारक चित्र आहे.

सध्या ज्या बागा ६० ते ८० दिवसांच्या पुढे आहेत, त्या बागांच्या मण्यांवर रोग दिसून येत आहे. यात बुरशीजन्य व जीवाणूजन्य करपा तसेच डाऊनी हे रोग आहेत, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका द्राक्ष बागेला बसला असून पन्नास टक्के नुकसान झाले आहे.

घड जिरणे, घड कुजणे अशी समस्या सुरू झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातूनही शेतकरी बागा वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे अगोदर कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटाची मालिका सुरू असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

त्यातच गेल्या चार ते पाच दिवसांपासून कधी ढगाळ वातावरण, तर कधी थंडी आणि धुके या साऱ्याचा परिणाम द्राक्ष बागेला बसू लागला आहे. धुक्यामुळे मण्यांवर पाणी राहत आहे. त्यामुळे मण्यांना तडे जाण्याची समस्या वाढली असून, परिणामी द्राक्षावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या संदर्भात महाराष्ट्र द्राक्ष संघ सांगली विभागाने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राला (पुणे) संपर्क केला आहे. द्राक्ष संशोधन केंद्राचे येत्या दोन ते तीन दिवसांत शास्त्रज्ञ येऊन बाधित झालेल्या द्राक्षांची पाहणी करणार आहेत. कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे याचे शास्त्रीय निदान केले जाणार आहे. काढणीला आलेली द्राक्षावर रोगांचा प्रादुर्भाव वाढ असल्याने नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त होत आहेत.

वादळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. त्यामुळे बुरशीजन्य व जीवाणूजन्य करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. आम्ही राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राशी संपर्क केला असून त्यांच्या तपासणीनंतर रोंगाचे शास्त्रीय निदान नक्की होऊन पुढील उपायांना दिशा मिळेल.
चंद्रकांत लांडगे, चेअरमन, मध्यवर्ती विज्ञान समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT