Action Plan Agrowon
ॲग्रो विशेष

Action Plan : ‘केव्हीके’च्या शास्त्रीय सल्लागार समितीत कृती आराखड्यावर चर्चा

Action Plan Discussion : कृषी विज्ञान केंद्राकडून मागच्यावर्षी राबवलेल्या विविध उपक्रमांसह आगामी वर्षभरातील कृती आराखड्यावर सर्वंकष चर्चा करण्यात आली.

Team Agrowon

Solapur News : सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात २४ व्या शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कृषी विज्ञान केंद्राकडून मागच्यावर्षी राबवलेल्या विविध उपक्रमांसह आगामी वर्षभरातील कृती आराखड्यावर सर्वंकष चर्चा करण्यात आली.

शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. भारतीय कृषी संशोधन परिषदच्या पुणे येथील अटारी संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश टी. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी सहयोगी संशोधन संचालक डॉ. डी. व्ही. इंडी, भारतीय तृणधान्य संशोधन संस्था उप-कार्यालयाचेडॉ. पुरुषोत्तम पतोत्री, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पोखरे, आत्माच्या प्रकल्प संचालक सौ. शीतल चव्हाण, नाबार्डचे व्यवस्थापक नितीन शेळके, बँक ऑफ इंडियाचे लीड बँक व्यवस्थापक राम वखारडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॅा. एल.आर. तांबडे यावेळी उपस्थित होते.

डॉ. तांबडे यांनी बैठकीच्या आयोजनामागील हेतू सांगितला. तसेच कृती आराखड्याचे सादरीकरण केले. त्यावर यावेळी सखोल चर्चा झाली, तसेच आगामी वर्षातील कृती कार्यक्रम, उपक्रमावर काही सूचनाही उपस्थितांनी केल्या. यावेळी डॉ. राजेश टी. यांनी कृषी विज्ञान केंद्र करत असलेल्या कार्याचा गौरव केला आणि केंद्राने किसान सारथीअंतर्गत शेतकऱ्यांना सल्ला व सेवा कार्य वाढविण्यासाठी सूचना केली.

सभेचे अध्यक्ष गायकवाड यांनी कृषी विज्ञान केंद्राकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. ते अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सभेचे सूत्रसंचालन अमोल शास्त्री यांनी तर आभार प्रदर्शन समाधान जवळ यांनी केले.

कृतिआराखडा शेतकरीभिमुख ठेवा

या बैठकीत विभागनिहाय वार्षिक कृती आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यात कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ सर्वश्री विकास भिसे, समाधान जवळगे, डॉ. प्रकाश कदम, अमोल शास्त्री, सौ. अनिता शेळके-सराटे, तसेच सहाय्यक राजेंद्र नेहे, डी एन. मूर्ती यांनी त्यांचे सादरीकरण केले. त्यावर उपस्थित सर्व मान्यवरांनी हा आराखडा अधिकाधिक शेतकरीभिमुख ठेवा, असे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT