Farmer Action Plan : मोदींच्या शेतीच्या ॲक्शन प्लॅनचं काय झालं? पहिल्या १०० दिवसांच्या शेती अजेंड्याचं घोडं नेमकं कुठे अडकलं ?

Agriculture Update : ॲक्शन प्लॅनमध्ये नेमकं काय असणार? याची पण माहिती दिली. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन आणि शिवराजसिंह कृषिमंत्री होऊन ४७ दिवस झाले तरी शेतीचा नेमका ॲक्शन प्लॅन काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना मोठं सरप्राईज देणार आणि त्यासाठी १०० दिवसांचा ॲक्शन प्लॅन राबविला जाणार, याची जोरदार चर्चा होती. कृषी मंत्रालय यासाठी झपाटून काम करत असल्याचा दावाही लाडके कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला होता.

हा प्लॅन कसा राबविणार याचे नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच या ॲक्शन प्लॅनमध्ये नेमकं काय असणार? याची पण माहिती दिली. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन आणि शिवराजसिंह कृषिमंत्री होऊन ४७ दिवस झाले तरी शेतीचा नेमका ॲक्शन प्लॅन काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

PM Narendra Modi
Prime Minister Narendra Modi :'आम्ही पूर्वीपेक्षा तिप्पट मेहनतीने काम करू' : मोदी यांचे आश्वासन

पंतप्रधान मोदी यांनी ९ जुलैला पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासूनच १०० दिवसांच्या ॲक्शन प्लॅनची चर्चा सुरु झाली. २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्या १०० दिवसांमध्ये प्रत्येक मंत्रालयाने काय करायचे? याचा अंजेडा तयार करण्यास सांगितले होते. त्याची चर्चा सातत्याने होत होती. प्रत्येक विभागाच्या मंत्र्यांनीही बैठका घेऊन याची जोरदार तयारी करत असल्याची प्रसिध्दी केली होती. 

कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी मंत्रालयात पहीली बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचननेनुसार कृषी मंत्रालयाचा १०० दिवसांच्या ॲक्शन प्लॅन तयार असल्याचे सांगितले होते. कृषी विभागाच्या प्लॅनमध्ये पिकांची उत्पादकता वाढविणे, उत्पादन वाढविणे आणि गुणवत्ता वाढविणे तसेच डिजिटल कृषी मिशन राबविण्याचा समावेश असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले होते. कृषिमंत्र्यांनी पहिला महिना या ॲक्शन प्लॅनच्या प्रसिध्दीमध्ये घलवला. पण हे सगळ करण्यासाठी नेमकं काय करणार? याची माहिती आजही त्यांनी दिली नाही. 

PM Narendra Modi
PM Narendra Modi : शंभर दिवसांत एक प्रभावी प्रकल्प द्या

भाजपला ग्रामिण भागात लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता. शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी नाराज होते. याची दखल काही नेत्यांनीही घेतली होती. त्यामुळे सरकार खरंच आता शेती आणि शेतकऱ्यांना गांभीर्याने घेऊन समस्या सोडविण्यासाठी काम करेल आणि त्याचाच एक भाग म्हणजे पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा आहे, असे चर्चा सगळीकडे सुरु होती. सगळेजण मोदी शेतकऱ्यांना नेमकं काय सरप्राईज देणार याची वाट पाहत होते. पण वाट पाहता पाहता ४७ दिवस होऊन गेले. मात्र मोदींचे सरप्राईज अजून आले नाही. 

नुकत्याच प्रसिध्द झालेल्या झालेल्या अर्थिक पाहणी अहवालात शेतीत मोठ्या बदलाची गरज असल्याचे म्हटले. पण अर्थसंकल्पात पोकळ घोषणा आणि तुटपुंजी निधीची तरतूद याशिवाय शेतीच्या वाट्याला काही आले नाही. त्यामुळे मोदी यांनी पहिल्या १०० दिवसांचा ॲक्शन प्लॅन केवळ जुमला होता, अशी टिका आता केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com