Orchard Visit Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Orchard Visit: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकांची आंबा बागेला भेट – केसर आंबा उत्पादनासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन!

Agriculture Innovation: महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे यांनी नगर जिल्ह्यातील गुगळे आंबा बागेची पाहणी केली. या भेटीत त्यांनी फळगळती नियंत्रण, रोग व्यवस्थापन, जिवाणूखतांचा वापर, तसेच निर्यातक्षम आंबा उत्पादनावर भर देण्याचा सल्ला दिला.

Team Agrowon

Pune News: महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे यांनी नगर जिल्ह्यातील देडगाव (ता. नेवासा) येथील गुगळे आंबा बागेस नुकतीच भेट देऊन पूर्ण बागेची पाहणी केली.

संशोधन संचालक डॉ. किशोर शिंदे व महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवानराव कापसे, तालुका फळ रोपवाटिका कृषी पर्यवेक्षक संजय कदम, गुगळे फॉर्मचे अध्यक्ष दिनेश गुगळे, प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब कोरडे, गणेश शेटे, वसंत तांबे, शिक्षण अधिकारी चव्हाण साहेब उपस्थित होते.

नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बालाजी देडगाव येथे श्री. गुगळे यांची १०० एकरावर केसर आंब्याची बाग आहे. अलीकडेच त्यांनी कृषी विद्यापीठाचे अतिघन तंत्रज्ञान पद्धतीने जवळपास ५० एकर केसर आंबा लागवड केली आहे. सध्या आंब्याला मोहर लागून फळधारणा सुरू आहे. त्यामुळे या बागेला श्री. भागडे यांनी भेट दिली.

या वेळी महासंचालक श्री. भागडे यांनी फळगळती नियंत्रण, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या तपासणी करून जिवाणू खतांचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य साठवणुकीसाठी स्टोरेजहाऊस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याबाबत सांगितले.

डॉ. श्री. भगवानराव कापसे यांनी निर्यातक्षम आंबा उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले. तर संशोधन संचालक डॉ. किशोर शिंदे यांनी आंबा फळबाग कीड व रोग नियंत्रणासाठी ‌ड्रोनद्वारे फवारणी केल्यास फायदेशीर ठरेल. नाशिक द्राक्ष बागायतदार यांच्याप्रमाणे शेतावरच फ्रूट टेस्टिंग लॅब उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT