Farm Road Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road : दिन्नापूर ते तोंडोळी शिवरस्ता केला मोकळा

Farm Road Encroachment : सत्तर वर्षांपासून अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त बंद असलेला दिन्नापूर ते तोंडोळी शिवरस्ता तहसील कार्यालयाच्या आदेशाने मोकळा करण्यात आला.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : सत्तर वर्षांपासून अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त बंद असलेला दिन्नापूर ते तोंडोळी शिवरस्ता तहसील कार्यालयाच्या आदेशाने मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिका-यानी मोकळा केल्याने शेतकऱ्यांना शेतीकडे ये-जा करण्यासाठी होणारी गैरसोय दूर झाली आहे.

तीन वर्षांपूर्वी दिन्नापूर येथील शेतकरी कृष्णा बाळकृष्ण खाटीक, भारत मोहनराव खनसे, आदी शेतकऱ्यांनी दिन्नापूर ते तोडोळी शिव रस्त्यावरील अतिक्रमण काढून शिव रस्ता मोकळा करण्याची मागणी पैठण तहसील कार्यालयात केली होती.

त्यावर तहसीलदार पैठण यांनी स्थानिक तलाठी,मंडळ अधिकारी यांच्या स्थळ पाहणी अहवाल व नियमित सुनावणी घेत सदर शिव रस्ता नकाशा नुसार मोकळा करण्यासाठी उपअधिक्षक भूमि अभिलेख यांनी हद्दी व खुणा कायम करून मंडळ अधिका-यानी रस्ता मोकळा करण्याचे आदेश जानेवारी २०२५ ला दिले होते.

त्यानुसार तीन दिवसांपूर्वी लोहगाव मंडळ अधिकारी वैशाली बैनवाड, ढोरकीन मंडळ अधिकारी सीमा भोसले, तोंडोळी तलाठी विमल बांगर, धूपखेडा सजा तलाठी शीतल निकम,बिडकीन पोलिस स्टेशन उप निरिक्षक सेना सहायक फौजदार सोमनाथ तांगडे, हवालदार कदम, पोलिस नाईक श्रीमती राठोड, ग्रामपंचायत पदाधिकारी भीमराव खनसे, संभाजी खनसे, शेतकरी यांच्या उपस्थितीत जवळ पास सहाशे मीटर शिव रस्ता जेसीबी यंत्राच्या मदतीने मोकळा केला. यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्या- येण्यासाठी होणारी गैरसोय दूर झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT