Milk Powder  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Powder : सांगलीतील दूध संघांपुढे भुकटी विक्रीची अडचण

Milk Powder Import : सांगली जिल्ह्यात खासगी दूध संघामार्फत प्रतिदिन सुमारे ३० टन दूध भुकटीचे उत्पादन होते. गेल्या महिन्यात दूध भुकटीचा दर २२० रुपये प्रतिकिलो होता.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : दूध भुकटी आयातीचा केंद्र सरकारने घाट घातला असल्याने जिल्ह्यातील दूध संघांबरोबरच उत्पादक शेतकऱ्यांचा याचा फटका बसण्याची शक्यता असून दूध भुकटी आणि दुधाच्या दरावर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगली जिल्ह्यात खासगी दूध संघामार्फत प्रतिदिन सुमारे ३० टन दूध भुकटीचे उत्पादन होते. गेल्या महिन्यात दूध भुकटीचा दर २२० रुपये प्रतिकिलो होता. मुळात गेल्या एक दोन महिन्यांपासून दूध भुकटीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे उठाव नाही. सध्या दूध भुकटीला प्रतिकिलो २०० रुपये दर आहे.

गत महिन्याच्या तुलनेत भुकटीच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे दूध संघ अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता केंद्राच्या नव्या निर्णयाने दूध संघांपुढे दूध भुटकी विक्रीची अडचण निर्माण झाली आहे. दूध भुकटी आयात केली तर सांगलीतील संघाने तयार केलेली भुकटी विक्री कशी होणार, असा प्रश्न संघांपुढे आहे. परिणामी भुकटीच्या दरात घसरण होण्याची शक्यताही संघाने वर्तवली आहे.

जिल्ह्यात गाई ३ लाख २४ हजार ७५६ तर म्हशी ४ लाख ९३ हजार ९९८ अशी एकूण ८ लाख १८ हजार ७५४ जनावरांची संख्या आहे. जिल्ह्यात सहकारी पाच, खासगी अकरा ११, मल्टीस्टेट दहा असे २६ संघ आहेत. या संघांमार्फत दूध संकलन होते. जिल्ह्यात आजमितीस प्रतिदिन सुमारे १५ लाख दूध संलकल होते. जिल्ह्यातील दोन संघ दूध भुकटी तयार करते. जिल्ह्यातील एकूण दूध संकलनापैकी १ लाख ११ हजार १३५ लिटर दुधापासून भुकटी तयार केली जाते.

जिल्ह्यातील एक संघ वगळता इतर संघांकडून गाईच्या दुधाला ३.५ फॅट व ८.५ एसएनएफला प्रतिलिटर २८ रुपये तर म्हशीच्या दुधाला ९ फॅट व ९ एसएनएफला ४९ रुपये प्रतिलिटर दर आहे. मुळात दूध दर कमी त्यातच पशुखाद्याचे वाढते दर यामुळे पुशपालक मेटाकुटीला आला आहे. त्यातच केद्रांने दूध भुकटी आयातीचा निर्णय घेतला असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवरील नवे संकट ओढावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुळात अगोदरच दुधाचे दर कमी असून पशुखाद्याचे वाढते दर यामुळे ताळमेळ घालताना अडचणी येत आहेत. त्यातच या नवीन निणर्यामुळे दूध दर कमी होतील, त्यामुळे आमच्यावरील संकट वाढेल.
- सुरेश भिसे, दूध उत्पादक शेतकरी
मूळात राज्यात दूध पावडर उत्पादन होत असताना दूध पावडर निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे होते. पण असे न करता केंद्राने आयातीचे चुकीचे धोरण राबवले आहे. त्याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. आयातीचे धोरण रद्द करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू.
- उमेश देखमुख, अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT