Agro Inputs Manufacturers Association of India Agrowon
ॲग्रो विशेष

M Association Election : ‘एम’ असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये धुरगुडे पॅनेल विजयी

Team Agrowon

Pune News : ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अर्थात ‘एम’ असोसिएशन ही भारतातील कृषी निविष्ठा उत्पादन क्षेत्रातील उत्पादकांची एक अग्रगण्य संस्था आहे. या असोसिएशनची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. २६) पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रँड या ठिकाणी पार पडली. या सभेला भारतातील विविध राज्यांमधून २०० हून अधिक ‘एम’ असोसिएशनचे सभासद उपस्थित होते.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत असोसिएशनच्या गव्हर्निंग कौन्सिल, अर्थात संचालक मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, सचिव समीर पाथरे, सहसचिव वैभव काशीकर यांच्यासह अकरा सभासदांची संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली.

असोसिएशनचे निवडणूक अधिकारी शिवाजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अंतिम छाननीनंतर अकरा अर्ज वैध ठरले. ज्यात मागील संचालक मंडळांमधील १०, तर एका नव्या सदस्याची निवड करण्यात आली. निवडून आलेले अकरा सदस्य पुढील प्रमाणे ः राजकुमार धुरगुडे पाटील, प्रदीप कोठावदे, समीर पाथरे, वैभव काशीकर, सर्जेराव शिसोदे, रवींद्र अग्रवाल, राजीव चौधरी, प्रकाश औताडे, प्रशांत शिंदे, अनिल हवल आणि कमलजित सिंग.

कृषी निविष्ठा उत्पादन क्षेत्रातील बायोस्टिम्युलंट उत्पादनांना केंद्र सरकारने खत नियंत्रण आदेश (FCO) कायद्यामध्ये समाविष्ट केले आहे. या प्रक्रियेमध्ये ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (एम) महत्त्वाची भूमिका बजावत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. बायोस्टिम्युलंट उत्पादनांना नोंदणीकृत करण्यासाठी लागणारे विविध ट्रायल डेटा एमने तयार करून केंद्र सरकारकडे सादर केला आहे.

या सभेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी सभासदांना एम असोसिएशनने केलेल्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, की आज ‘एम’ने तयार केलेला डेटा केंद्र सरकारने मान्य केला असून त्या आधारेच आठ बायोस्टिम्युलंट उत्पादनांना एफसीओमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याचा फायदा देशातील सर्व कृषी निविष्ठा उत्पादकांना होणार असून, एम असोसिएशनने यासाठी केलेले कष्ट हे देशातील सर्व शेतकऱ्यांना देखील उपयुक्त ठरणार आहेत. एमने देशातील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सदर उत्पादनांचा डेटा सर्वांसाठी लागू करण्यासाठी सहमती दर्शवली. एमने फक्त स्वतःच्या फायद्यासाठीची संकुचित भूमिका न घेता व्यापक हित लक्षात ठेवत घेतलेल्या निर्णयाचा कृषी क्षेत्राला भविष्यात नक्कीच खूप मोठा फायदा होणार आहे. याबरोबरच त्यांनी संचालक मंडळाला पुन्हा निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले.

या सभेमध्ये संस्थेचे सचिव समीर पाथरे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या मागील वर्षातील कार्याचा आढावा घेतला. याचबरोबर येणाऱ्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल सभासदांना माहिती दिली. बायोस्टिम्युलंट नोंदणीसाठी लागणाऱ्या फॉर्म जी मिळवण्यासाठीच्या तांत्रिक बाबींबद्दल त्यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. या सभेत सर्जेराव सिसोदे यांनी वार्षिक ताळेबंद सादर केला. वैभव काशीकर, प्रदीप कोठावदे आणि अनिल हवल यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रकाश औताडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

Seed Industry : बियाणे उद्योगावरील जाचक नियंत्रणे हटवा

Agriculture Department : ‘लाडक्या कंत्राटदारा’मुळे कृषी पुरस्कार्थी जेरीस

Bamboo Planting Workshop : पौडमध्ये बांबू लागवड कार्यशाळा

B.B. Thombare : बी. बी. ठोंबरे साखर उद्योगासाठी मार्गदर्शक : राज्यपाल बागडे

SCROLL FOR NEXT