APMC  Agroown
ॲग्रो विशेष

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

APMC Update : नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्टा कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र लेव्हीच्या मुद्द्यावर व्यापारी व हमाल मापाऱ्यांच्या वादामध्ये बाजार समितीचे कामकाज सध्या अडचणीत सापडल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्टा कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र लेव्हीच्या मुद्द्यावर व्यापारी व हमाल मापाऱ्यांच्या वादामध्ये बाजार समितीचे कामकाज सध्या अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथे गुरुवारी (ता. २) खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यात आली असून, पहिल्या दिवशी ८० वाहनांचा लिलाव करून रोख स्वरूपात मोबदला देण्यात आला.

जवळपास २० व्यापारी येथे खरेदीसाठी असल्याची माहिती संचालक सुरेश पवार यांनी दिली. येथे किमान ३०० ते कमाल २३५१ रुपये दर मिळाला. तर सरासरी दर १५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुरेश पवार, गोदावरी पवार, गणेश पवार यांनी श्रीफळ अर्पण करून उन्हाळी कांदा लिलावाचा प्रारंभ केला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यास येथील आवारात मोफत पाणी, चहा व नाश्ता देण्यात येणार आहे. ४० रुपयांत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने शेतकरी, वाहनचालक व व्यापारी यांना वेळप्रसंगी आराम व मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. स्थानिकांसह बाहेरील व्यापारीही येथील कांदा लिलावात भाग घेऊन शकतील, असे त्यांनी सांगितले.

या वेळी प्रगतिशील शेतकरी कृष्णा भामरे, भाऊसाहेब अहिरे, मधुकर साळवे, पांडुरंग पवार, मोहन भामरे, नीलेश कापडणीस, गणेश पवार, रमेश पवार, राकेश पवार, प्रशांत बोरसे, काशीनाथ नंदन, सुनील गवळी, शाम अहिरे, ज्ञानेश्वर देवरे, दिलीप भामरे, रावसाहेब ठोंबरे, भिला ठोंबरे, प्रदीप कांकरिया, सनी शर्मा, प्रमोद निकम, नीलकंठ निकम, प्रमोद अहिरे, मोठाभाऊ देवरे, साहेबराव पगारे, शरद भामरे, वसंत भामरे, केवळ देवरे, राहुल कदम, चेतन वाघ, कन्हैया माळी

पोपट जाधव, प्रवीण अहिरे, बापू महाजन, अप्पा कापडणीस, जालिंदर देवरे, कसमादे परिसरासह शेतकरी उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे शैलेंद्र कापडणीस यांनी मनोगत व्यक्त केले.

कष्टकरी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत योग्य भाव मिळावा, यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजाराची निर्मिती करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार दरम्यान बाजार समितीमध्ये लिलाव होणार आहेत.
सुरेश पवार, संचालक, खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती
कसमादे खासगी बाजार समितीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आर्थिक विकास साधावा. या बाजार समितीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
बिंदू शर्मा, महामंत्री, भाजप किसान मोर्चा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT