Anjali Damania Allegations Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : दमानिया यांच्या आरोपाला मंत्री धनंजय मुंडे यांचे उत्तर; आरोप फेटाळत दमानियांवर टीका

Anjali Damania Allegations : या आरोपाला उत्तर देत मंत्री धनंजय मुंडे यांनी डीबीटीमध्ये काय ठेवायचं आणि काय वगळायचं याचे नियमानुसार अधिकार मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांचे आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या पूर्व मान्यतेनुसार ही प्रक्रिया करण्यात आली आहे, असं सांगत मुंडे यांनी आरोप फेटाळून लावले आहे.

Dhananjay Sanap

Dhananjay Munde Counter Allegations: राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कृषी उद्योग विकास महामंडळाच्या निविष्ठा खरेदीत डीबीटीला वगळून तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घोटाळा केल्याचा आरोप दमानिया यांनी केला. या आरोपाला उत्तर देत मंत्री धनंजय मुंडे यांनी डीबीटीमध्ये काय ठेवायचं आणि काय वगळायचं याचे नियमानुसार अधिकार मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांचे आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या पूर्व मान्यतेनुसार ही प्रक्रिया करण्यात आली आहे, असं सांगत मुंडे यांनी आरोप फेटाळून लावले आहे. दमनिया यांच्या आरोपाचं मुंडे यांनी मंगळवारी (ता.४) पत्रकार परिषदेत खंडन केलं.

१२ ते १६ मार्च २०२४ च्या दरम्यान डीबीटी खरेदी करण्यापूर्वी निधी संबंधित कंपन्यांना देण्यात आल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना मुंडे म्हणाले, "अंजली ताई शेतकरी आहेत की नाही माहीत नाही. परंतु मॉन्सून पूर्वी शेतीच्या मशागती कराव्या लागतात. एप्रिल आणि मेमध्ये लोकसभा निवडणूकची आचारसंहिता आणि जून महिन्यातील खरीप हंगाम लक्षात घेऊन सदर खरेदी करण्यात आली आहे." असंही मुंडे म्हणाले.

निविदा प्रक्रियेत दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली आहे. नॅनो युरिया, नॅनो डीएपीचे दर देशभरात एकच आहेत, असा दावा करत मुंडे यांनी दमानिया यांच्यावर टिकाही केली. मागील ५८ दिवसांपासून माझ्यावर मिडिया ट्रायल सुरू आहे. त्यात आता निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याची सनसनाटी अंजली ताई पसरवून मला बदनाम करत आहे, असं मंत्री मुंडे म्हणाले.

फवारणी पंप आणि कापूस बॅग दुप्पटीच्या दराने खरेदी करण्यात आल्याचा आरोपही दमानिया यांनी केला. त्यावर मुंडे म्हणाले, " राज्य सरकारने सर्वात कमी किमतीत पंप खरेदी केले आहेत. राज्य सरकारने २ हजार ८५७ रुपये प्रति पंप खरेदी केला आहे. तर कापूस बॅग सीडकॉट या केंद्र सरकारच्या कंपनीने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी केली आहे, असंही मुंडे यांनी सांगितलं. तसेच अंजली दमानिया यांनी केलेली आरोप देशात कुठेही टिकला आहे का, याचा शोध घेण्याचे आवाहन मुंडे यांनी केलं आहे.

नॅनो युरिया नॅनो डीएपी घोटाळ्याला उत्तर देताना मुंडे म्हणाले, " राज्यातील ४ लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचं वाटप झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली आहे. शेतकऱ्यांना नॅनो युरियापूर्वी दीड एकरच्या खतासाठी १६०० पेक्षा अधिक खर्च यायचा. परंतु आता खर्च कमी झाला आहे, अशी मुंडे यांनी बाजू मांडली.

दरम्यान, मुंडे यांच्यावर दुप्पटीच्या दराने आणि डीबीटी डावलून कृषी निविष्ठा खरेदीचा आरोप दमानिया यांनी केला आहे. परंतु त्यावर मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि त्या खात्याचा मंत्री या दोघांपेक्षाही दमानिया यांना नियम माहित आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु खरेदीच्या किंमतीवर स्पष्ट उत्तर देणं टाळलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT