Devsthan Inam Land agrowon
ॲग्रो विशेष

Devsthan Inam Land : देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करा, किसान सभेची मागणी

Kisan Sabha : देवस्थान इनाम जमिनीच्या सात-बारावर कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्वीप्रमाणे समाविष्ट करावीत असे निवेदन देण्यात आले.

sandeep Shirguppe

Kolhapur Devsthan Land : नुकताच राज्य शासनाने मराठवाड्यातील देवस्थानांच्या वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यासाठी कायदा करून देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या या संबंधित शेतकऱ्याच्या नावावर कराव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने काल(ता.२३) जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

राज्य उपाध्यक्ष डॉ. उदय नारकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनातील मागण्या अशा, देवस्थान इनाम जमिनीच्या सात-बारावर कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्वीप्रमाणे समाविष्ट करावीत, तसेच त्यांची वारसा नोंद करण्यात यावी, यावर्षी जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करावा.

यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी व त्यांचे पीक कर्ज माफ करावे, राज्य शासनाने जाहीर केलेली शेती पंपासाठीची वीज बिल माफीची योजना ‘एचपी’ची कोणतीही अट न लावता सरसकट सर्व शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना लागू करावी, सर्व खंडकरी शेतकऱ्यांचा खंड भरून घेण्यात यावा.

सर्व देवस्थान शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच जिल्हा मध्यवर्ती बँक व सर्व राष्ट्रीयीकृत बँका यांच्या माध्यमांतून पीक कर्ज मिळावे, देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजना व इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करण्यात यावा.

जिल्ह्यामध्ये नवीन रस्ते व पूल बनविताना नदीपात्रालगत भराव टाकण्याऐवजी पिलर बांधून करावे, साखर निर्यातीवरील बंदी हटवण्यात यावी आणि इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन द्यावे, गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला रुपये शंभर रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या.

शिष्टमंडळात उमेश देशमुख, दिनकर आदमापुरे, आप्पा परीट, चंद्रकांत कुरणे, बाळासाहेब कामते, लक्ष्मण पाच्छापुरे, शिवाजी गुरव, नारायण गायकवाड, विलास पाटील, युवराज भोसले, तुळसाराम पाटील, भीमराव देसाई, संभाजी मोहिते, आदींचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Sugarcane Protest: एफआरपी थकित असताना ८ कारखाने कसे सुरु झाले?, कोल्हापुरात १४ संघटनांचे हातात चाबूक घेऊन आंदोलन

Water Scarcity: जलसंकटाचे सावट

Paddy Harvest: चंदगड तालुक्यात पावसाच्या धास्तीने भात कापणी वेगात

Ativrushti Madat: अतिवृष्टीच्या मदतीचे ७० टक्के वितरण

Agrowon Podcast: शेवग्यातील तेजी टिकून; मेथीचे दर टिकून, सिताफळ दरात नरमाई, गाजराला उठाव तर मुगाचा भाव दबावातच

SCROLL FOR NEXT