Avinash Deshmukh Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Team Agrowon

Pune News : साखर आयुक्तालयाच्या उपपदार्थ विभागाला अखेर नवा प्रमुख मिळाला आहे. विभागाचे सहसंचालक म्हणून अविनाश देशमुख यांनी सूत्रे स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे.

बीडच्या गेवराईमधील उमापूरमधील शेतकरी कुटुंबातील श्री. देशमुख कृषी शाखेचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. महाराष्ट्र कृषिसेवा परीक्षेच्या १९९० मधील तुकडीतून ते कृषी खात्यात फलोत्पादन अधिकारी म्हणून रुजू झाले. पैठणच्या प्रसिद्ध ज्ञानेश्वर उद्यानाचे अधीक्षक म्हणून त्यांनी सेवा केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुन्हा परीक्षा देत १९९४ मध्ये ते सहायक निबंधक म्हणून सहकार खात्याच्या सेवेत आले आहेत.

संगमनेर, कराड, पुणे शहर येथे उपनिबंधक म्हणून; तर सोलापूरला जिल्हा उपनिबंधक म्हणून श्री. देशमुख यांनी उत्तम सेवा बजावली. अलीकडेच राज्याच्या पणन मंडळात गेली चार वर्षे उपसंचालक म्हणून बाजार समिती विभागाचे कामकाज सांभाळत होते.

साखर आयुक्तालयाच्या उपपदार्थ विभागाच्या सहसंचालकपदी त्यांना पदोन्नतीने नियुक्ती मिळाली आहे. सूत्रे स्वीकारताच त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांमधील इथेनॉल, प्रेसमड, मळीस बगॅस याच्याशी संबंधित समस्यांचा आढावा घेणे सुरू केले आहे.

‘‘इथेनॉल निर्मितीमधील अडचणी सोडविण्याबरोबरच सहवीज प्रकल्पांना बळकटी देणे, उपपदार्थांच्या निर्मितीमधील अडचणी दूर करणे तसेच सौर निर्मितीसारखे अन्य पर्याय मिळवून देण्यासाठी साखर कारखान्यांना मदत करण्यात उपपदार्थ विभाग सतत प्रयत्नशील राहील,’’ असे श्री. देशमुख यांनी सांगितले. साखर उद्योगातील आसवनींचे व्यवस्थापक, तांत्रिक व उपपदार्थांशी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT