DCM Devendra Fadnavi Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadnavis : वसाळी, सायखेडला वीज उपकेंद्र सुरू करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

संग्रामपूर तालुक्यात सोनाळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये टुनकी व सोनाळा ही दोन उपकेंद्रे आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये मोडतात.

Team Agrowon

Buldhana News : सातपुड्याच्या पायथ्याशी सोनाळा जिल्हा परिषद सर्कलमधील वसाळी व सायखेड येथे नवीन वीज उपकेंद्र सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. १४) दिले.

सोनाळा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद खोद्रे यांनी मुंबई येथे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन दिले.

या निवेदनाची तातडीने दखल घेण्यात आली आहे, अशी माहिती या भागाचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद खोद्रे यांनी दिली.

संग्रामपूर तालुक्यात सोनाळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये टुनकी व सोनाळा ही दोन उपकेंद्रे आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये मोडतात. या परिसरामध्ये बारमाही बागायत क्षेत्र असून, भुईमूग, मका, कांदा, कपाशी, संत्रा, केळीचे उत्पादन घेतले जाते.

यामुळे सध्या कार्यरत असलेल्या दोन्ही उपकेंद्रांवर अतिरिक्त दाब येतो. परिणामी, या परिसरातील शेतकऱ्यांची वीज वारंवार खंडित होत असल्याने पिके धोक्यात आली.

आदिवासींची उपजीविका शेतीवर आहे. वसाळी, हडियामहाल, आलेवाडी, चिचारी, निमखेडी, सायखेड, पिंगळी, सोनाळा, टुनकी, लाडणापूर या गावांतील शेतकरी वीज समस्येमुळे हवालदिल झाले आहेत.

त्यामुळे वसाळी व सायखेड येथे तातडीने ३३ केव्हीचे नवीन वीज उपकेंद्र मंजूर करण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंत्यांना या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती प्रमोद खोद्रे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Electric Tractor Subsidy : इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला अनुदान, एआयचा वापर आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहनाची शिफारस; स्थायी समितीचा अहवाल सादर

Soybean Procurement: पाच लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी शिल्लक आहे का?; पणनमंत्र्यांचा मोठा खुलासा

Organic Turmeric Branding: वाशीमच्या सेंद्रिय हळदीचे होणार ब्रँडिंग

Farmer Struggle Story: कैलास नागरेंच्या बलिदानाची वर्षपूर्ती

Soil Health: एकात्मिक खत व्यवस्थापनातून राखा जमिनीचे आरोग्य

SCROLL FOR NEXT