Dr. Indra Mani  Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture Research : रेशीम शेतीविषयक संशोधनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा : डॉ. इंद्र मणी

Dr. Indra Mani : रेशीम शेतीविषयक संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : मराठवाड्यातील जिरायती बहुल क्षेत्रातील शेतकऱ्यांना हवामान बदलांच्या परिस्थितीत शेतीतील उत्पन्नांचे विविध पर्याय निवडावे लागतील. रेशीम व दुग्ध व्यवसाय (सिल्क अँड मिल्क) हा कृषीपूरक उद्योगाचा चांगला पर्याय आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये रेशीम शेतीविषयक ज्ञान व कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध विभागांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील. रेशीम शेतीविषयक संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना, कृषी विभाग, आत्मा व जिल्हा रेशीम कार्यालय यांच्यातर्फे मंगळवारी (ता. ६) रेशीम संशोधन योजना येथे प्रौढ रेशीम कीटक संगोपन व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या वेळी अध्यक्षस्थानी डॉ. इंद्र मणी होते. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) संगीता चव्हाण, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी,

कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. एच. नेहरकर, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम, केंद्रीय रेशीम मंडळाचे अशोक जाधव, तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, भारतीय स्टेट बँकेचे सल्लागार सुनील हट्टेकर, डॉ. संजोग बोकन, डॉ. धनंजय मोहोड, एम. एल. आगम, सागर मिसाळ उपस्थित होते.

डॉ. मणी म्हणाले, की महिला रेशीम शेती चांगल्याप्रकारे करू शकतात. शेतकऱ्यांना नैराश्यमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. उझी माशीच्या नियंत्रणासाठी एन. टी. पाउचचे उत्पादन वाढवावे लागेल. सूत्रसंचालन डॉ. मोहोड यांनी केले तर आभार डॉ. नेहरकर यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT