Dengue Cases  Agrowon
ॲग्रो विशेष

Raigad Dengue Cases : रायगड जिल्ह्यात हिवताप निर्मूलनावर भर

Dengue Test : रायगड जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून कधी ऊन, कधी पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Team Agrowon

Raigad News : रायगड जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून कधी ऊन, कधी पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हिवताप विभागामार्फत रक्तचाचणी केली जात आहे.

जानेवारी ते जूनदरम्‍यान एकूण एक हजार ७३८ जणांच्या रक्‍ताचे नमुने तपासले असून, यात ३९ रुग्‍ण आढळले. त्‍यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या यंदा घटली आहे. सहा महिन्यांत पनवेलमधील शहरी भागात एक हजार १५२ जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात २५ रुग्‍ण आढळले तर उरण येथे ५८ जणांचे नमुने तपासले असता दोन रुग्‍ण आढळले.

पनवेल ग्रामीण भागात १२१ जणांचे नमुने तपासले असता एक सक्रीय रुग्‍ण आला. खालापूर येथे ४४ जणांपैकी एक रुग्‍ण, सुधागड येथे २६ जणांपैकी एक रुग्‍ण, अलिबाग येथे ६६ जणांपैकी चार रुग्‍ण, मुरूड येथे १४३ जणांचे नमुने तपासले असता दोन सक्रिय रुग्‍ण आढळले.

रोहा तालुक्यात २८ जणांचे नमुने तपासले तेथे एक रुग्‍ण आढळला.माणगाव तालुक्यात १०० जणांचे नमुने तपासले असता दोघे पॉझिटिव्ह आले. उर्वरित कर्जत, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, आणि पोलादपूर येथे सहा महिन्यात एकही डेंगीच्या रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाकडून देण्यात आली.

डॉक्‍टरांचा सल्‍ला घेण्याचे आवाहन

ज्‍या तालुक्यात डेंगीसदृश परिस्थिती निर्माण होते, तेथे कर्मचारी जाऊन सर्वेक्षण करतात. डेंगीची अळी नष्ट करण्यासाठी ऑबिट द्रावण मिसळून दिले जाते. पावसाळ्याच्या दिवसांत घराचा परिसर अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यांसारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होते, अशी ठिकाणे नष्ट करावीत. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. त्यामुळे डासांचा शिरकाव होणार नाही. आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयीन अधीक्षक सिद्धार्थ चैरे यांनी केले आहे.

२० खाटांचा कक्ष कार्यान्वित

पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा आणि डासांच्या उपद्रवामुळे साथीचे आजार बळावतात. डेंगी, मलेरिया, अतिसार यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढतात. दरवर्षी साथीच्या आजारांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक सुविधांची तयारी आधीच करण्यात आली आहे.

पुरेसा औषधसाठाही मागविण्यात आला असून, थंडी-तापाच्या रुग्णांवर तत्काळ उपचार केले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले असून २० खाटांचा नियमित कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT