Jat Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Jat Water Crisis : जत तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Drought Condition : तालुक्यातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, जनावरांना पाणी व चारा मिळणे दिवसेंदिवस बिकट होत आहे. शिवाय २५ गावांमध्ये २९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Team Agrowon

Sangli News : जत तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (ता. २७) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत, अशी माहिती आमदार विक्रम सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, की जत तालुका शंभर टक्के अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील सर्व तलावांमध्ये सद्यःस्थितीत तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २७ पैकी १० तलावांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असून उर्वरित तलावांमध्ये मृतसंचय साठा आहे.

पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. रब्बी हंगाम पेरणी करणे शक्य नाही. तालुक्यातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, जनावरांना पाणी व चारा मिळणे दिवसेंदिवस बिकट होत आहे. शिवाय २५ गावांमध्ये २९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

अशी विदारक परिस्थिती असताना जत तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जात नाही. हा येथील जनतेवर अन्याय आहे. प्रथम नागपूर येथील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राच्या मोबाइल ॲपद्वारे चुकीचे सर्वेक्षण केलेल्या कंपनीचा सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध नोंदविला.

शिवाय, शासनाचे डोळे उघडण्यासाठी शुक्रवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षणीय उपोषण करणार असल्याचे आमदार सावंत व जगताप यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT