Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Sakalai Irrigation Scheme: साकळाई जलसिंचन योजनेसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना साकडे!

Water Crisis in Ahmednagar: अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांसाठी साकळाई जलसिंचन योजनेस निधी मिळावा म्हणून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News: साकळाई उपसा जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळून अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी वर्ग करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. यासाठी साकळाई उपसा जलसिंचन योजना कृती समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी जलसंपदामंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटणार आहेत. श्रीगोंद्यातील विसापूर तलावात कुकडीचे पाणी टाकून ते पाणी पुढे श्रीगोंदा, अहिल्यानगर तालुक्यातील दुष्काळी गावांना दिले जाणार आहे.

अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी, सिंचनाचा अभाव असलेल्या ३२ गावांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी साकळाई उपसा जलसिंचन योजना करण्याचे ठरले. साधारण पंचवीस- तीस वर्षांपासून या योजनेसाठी लोकांचा लढा सुरू आहे.

या योजनेच्या नावावर मते घेत आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या परंतु अजूनही योजना झाली नाही. लाभधारक क्षेत्रातील ३५ गावांमधील नागरिकांनी योजनेसाठी वारंवार आंदोलन, उपोषण, मोर्चे, रास्तारोको, निवेदने देऊन सरकारला जागे करण्याचे काम केले.

परंतु, अद्यापही साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी वाळकी येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना

साकळाई योजना मार्गी लागण्याचा शब्द दिला होता. आत्ताही राज्यात महायुतीचे सरकार आहे. या योजनेचा पाठपुरावा करून नेत्यांनी साकळाईच्या सर्वेक्षणाचे आदेश काढले, सर्वेक्षण पूर्ण झाले. आता योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. यासाठी कृती समितीचा पाठपुरावा सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT