Cotton Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Shortage: सरळ कापूस वाणांची मागणी अधिक राहणार

Cotton Farming Challenges: खानदेशातील शेतकरी सरळ व देशी सुधारित कापूस वाणांकडे वळत असले तरी दर्जेदार वाणांचा पुरवठा दरवर्षीप्रमाणे यंदाही अपुरा आहे. त्यामुळे बियाण्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांची वणवण कायम आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात सरळ किंवा देशी सुधारित, देशी संकरित कापूस वाणांची लागवड बऱ्यापैकी होते. परंतु हे वाण हवे तेवढे व हव्या त्या कंपनीकडून उपलब्ध होत नाही. त्यांचा यंदा तुटवडा भासणार नाही, यासंबंधी कार्यवाहीची मागणी केली जात आहे. खानदेशात छुप्या मार्गाने अवैध कापूस बियाणे दाखल होत आहे. कृषी विभाग कारवाई सत्र राबवीत आहे. परंतु अशातच सरळ वाणांची मागणी अधिक असते. हे वाण मात्र पुरेसे नसतात.

कापूस लागवडीत खानदेश अग्रेसर आहे. पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची सुमारे दोन लाख हेक्टरवर खानदेशात लागवड होते. तर एकूण लागवड क्षेत्र साडेआठ लाख हेक्टर एवढे असते. यात खानदेशात बेवडसाठी तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात देशी किंवा सरळ कापूस वाणांची लागवड केली जाते.

परंतु मागील तीन-चार वर्षे दर्जेदार व मुबलक प्रमाणात सरळ वाण उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. या वाणांसाठी शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातची वाट नाइलाजाने धरतात. यंदाही तशीच स्थिती असणार आहे. कारण यंदाही सरळ वाणांचा पुरवठा किती व कसा, केव्हा होईल, याचा कुठलाही आराखडा, नियोजन नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खानदेशात सुमारे ४० लाख कापूस बियाणे पाकिटांची कापूस लागवडीसाठी गरज आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्यात २५ लाखांवर कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा अपेक्षित आहे. कापूस बियाण्याचा ९९ टक्क्यांवर पुरवठा खासगी कंपन्या, पुरवठादार करतात. या बियाण्यांसाठी खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते.

यात ९८ ते ९९ टक्के कापूस बियाणे बीटी (बोलगार्ड २) प्रकारातील असते. यात देशी कापूस बियाणे अल्प येते. त्यातही दर्जेदार सरळ किंवा देशी वाण उपलब्ध होत नाही. दोन वर्षांपूर्वी एका कंपनीने राज्यात किंवा खानदेशात आपले सरळ कापूस वाण उपलब्ध होणार नाही, बिजोत्पादन कार्यक्रमाचे नुकसान झाले होते, असे म्हटले होते.

यंदाही खानदेशात तीन ते चार लाख पाकिटे सरळ वाणांचा पुरवठा अपेक्षित आहे. परंतु पुरवठा होत नाही. काही कंपन्यांचे सरळ वाण जूनच्या मध्यात येतात. या वाणांची गरज बागायती पट्ट्यात असल्याने त्यांचा पुरवठा २० मेपर्यंत कृषी केंद्रांत व्हायला हवा, असाही मुद्दा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT