Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : नांदेडसाठी कपाशीच्या साडेदहा लाख पाकिटांची मागणी

Agriculture Department : यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित धरून दहा लाख ५२ हजार पाचशे पाकिटांची मागणी केली आहे. तर सोयाबीनचेही एक लाख १८ हजार क्विंटल बियाणे लागणार, असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.

Team Agrowon

Nanded News : आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. यासाठी बियाणे व खतांच्या नियोजनात प्रशासन काम करीत आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित धरून दहा लाख ५२ हजार पाचशे पाकिटांची मागणी केली आहे. तर सोयाबीनचेही एक लाख १८ हजार क्विंटल बियाणे लागणार, असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.

खरीप हंगाम २०२४-२०२५ च्या तयारीकरिता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांसह राज्य शासनाचा कृषी विभाग तयारीला लागला आहे. पेरणीच्या काळात लागणारे विविध पिकांचे बियाणे, खते शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध व्हावे, याकरिता नियोजन सुरू आहे. दोन लाख टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने विविध यंत्राणांकडे बियाण्यांची मागणी नोंदवली आहे.

यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ यासह खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. आगामी काळात कपाशीच्या क्षेत्रात दोन लाख १० हजार हेक्टरवर वाढ अपेक्षित धरून कृषी विभागाने दहा लाख ५२ हजार पाचशे पाकिटांची मागणी केली आहे. यासोबतच सोयाबीनही पाच लाख ५२ हजार हेक्टरवर लागवडीचा अंदाज व्यक्त केला आहे.

हे वाढीव क्षेत्र लक्षात घेता आगामी काळात एक लाख १८ हजार क्विंटल बियाणे लागण्याचा अंदाज व्यक्त करून तशी मागणी केली आहे. तसेच ज्वारीचे ९७५ क्विंटल बियाणे, भात २९९ क्विंटल, तूर ३४९१ क्विंटल, मूग ५०३ क्विंटल उडीद १४ हजार पाचशे क्विंटल, संकरित कापूस दहा लाख २५ हजार पाचशे पाकीट, तीळ सहा क्विंटल, तर सोयाबीन एक लाख १८ हजार क्विंटल बियाणे लागेल असा अंदाज व्यक्त करून मागणी केली आहे.

कपाशी, तुरीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

आगामी खरिपात कपाशी तसेच तुरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचा वाढलेला उत्पादन खर्च तसेच दरात घसरण यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीचा कल कमी दिसून येत आहे. त्याच्या तुलनेत यंदा कपाशी व तुरीला चांगला दर मिळाल्याने शेतकरी या पिकाकडे वळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू

Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

SCROLL FOR NEXT