Flower Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Market : लक्ष्मीपूूजन, पाडव्यामुळे झेंडू, शेवंतीला मागणी वाढली

Pune Flower Market : दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि पाडवा या महत्त्वाच्या दोन सणांसाठी पुणे बाजार समितीमधील फुलबाजार झेंडू, शेवंतीसह विविध प्रकारच्या विविधरंगी फुलांनी फुलला आहे.

Team Agrowon

Pune News : फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त बाजारात चांगले दर मिळत आहेत. दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि पाडवा या महत्त्वाच्या दोन सणांसाठी पुणे बाजार समितीमधील फुलबाजार झेंडू, शेवंतीसह विविध प्रकारच्या विविधरंगी फुलांनी फुलला आहे.

राज्यातील फूल उत्पादक शेतकरी गणशोत्सव, नवरात्र, दसरा दिवाळी या सणांसाठीचे नियोजन करून, फुलांची लागवड करत असतात. यंदाच्या हंगामात लांबलेल्या मॉन्सूनचा परिणाम फूल उत्पादनावर झाला. यामुळे चांगल्या दर्जाच्या फुलांचे दर टिकून राहिले होते. विविध हंगामात महत्त्वाच्या असलेल्या झेंडू, शेवंतीच्या फुलांचे दर अनुक्रमे सरासरी १०० ते २५० रुपयांपर्यंत टिकून राहिले.

दिवाळीसाठीच्या फुलांची ग्राहक आणि हार आणि फूल व्यावसायिकांकडून मागणी मंगळवारपासून (ता. २९) सुरू झाली. यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, यवत, माळशिरज, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या भागांमधून तर नगर, सातारा, धाराशिव, हिंगोली, मोहोळ, सोलापूर, बीड, तसेच कर्नाटकातूनही फुलांची आवक होत होती. या फुलांना पुणे शहरासह, उपनगरे आणि कोकणातील काही भागांतून मागणी वाढली होती.

दिवाळीनिमित्त विविध दुकाने, आस्थापना, औद्योगिक कंपन्या, माहिती तंत्रज्ञान उद्योगांकडून सजावटीसाठी फुले आणि हारांना मागणी वाढल्याने झेंडू आणि शेवंतीचे भाव वधारले होते. मागील आठवड्यात ४० ते ५० रुपये दराने विकल्या जाणाऱ्या झेंडूचा भाव १०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात हेच दर १५० रुपयांपर्यंत होते. तर कर्नाटक बेळगावमधून आवक कमी झाल्याने स्थानिक फुलांचे दर वाढले होते.
सागर भोसले, फुलांचे प्रमुख आडतदार
लांबलेल्या पावसामुळे फुले भिजली होती. त्यातच धुक्यामुळे काही प्रमाणात फुले काळी पडली होती. परिणामी चांगल्या दर्जाच्या फुलांना मागणी होती. दर देखील चांगले होते. यंदाचा दसरा दिवाळी हंगाम चांगला गेला.
अरुण वीर, अध्यक्ष, अखिल फूल बाजार अडते असोसिएशन
मी दसरा दिवाळीच्या नियोजनानुसार ३० गुंठ्यात झेंडूच्या ४ हजार ५०० रोपांची लागवड केली होती. दिवाळीसाठी मी गुरुवारी (ता. ३१) ९० क्रेट झेंडू विक्रीसाठी आणला होता. या वेळी ८० ते ९० रुपये दर मिळाला. दसऱ्यालादेखील हाच दर मिळाला होता. दोन महिन्यांच्या पिकांमध्ये ९० हजार रुपये उत्पन्न मिळाले. पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले, उत्पादन घटले, मात्र दर चांगला मिळाल्यामुळे हंगाम चांगला गेला.
योगेश हंडाळ, परांडा, धाराशीव

गुरुवारी (ता. ३१) बाजार समितीतील फुलांचे किलोचे भाव

झेंडू ५० ते १२० रुपये

शेवंती ६० ते २५० रुपये

कापरी ५० ते १२० रुपये

ॲस्टर सुट्टा १५० ते २५० रुपये

गुलछडी ३०० ते ५०० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market: कांद्याला समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची मागणी

Cotton Farmers Seminar: कापूस संशोधन विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी पीक परिसंवाद

Israel Iran conflict: इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला; इराणमध्ये आणीबाणी, मध्यपूर्वेतील तणाव तीव्र

Washim Development: समन्वय, नियोजनातून प्रगती

Ayushman Bharat Yojana: रुग्णालयांत उपचारांचे दरपत्रक लावावे लागणार

SCROLL FOR NEXT