Rice Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Harvesting : भातझोडणीनंतर वैरणीला मागणी

Rice Crop Farming : रसायनी परिसरात दुबार भाताचे पीक चांगले आले आहे. मात्र, वातावरणात जाणवणारा प्रचंड उकाडा, ढगाळलेल्‍या वातावरणामुळे पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापणीपाठोपाठ झोडपणीची काम सुरू केली आहे.

Team Agrowon

Rice Crop Update : रसायनी परिसरात दुबार भाताचे पीक चांगले आले आहे. मात्र, वातावरणात जाणवणारा प्रचंड उकाडा, ढगाळलेल्‍या वातावरणामुळे पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापणीपाठोपाठ झोडपणीची काम सुरू केली आहे.

तसेच वैरणीचे (पेंढा) नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी वैरणीची विक्री लगेच करत आहेत. तर वैरणीला दुग्ध व्यवसायिकांकडून मागणी असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.

रसायनी परिसरातील वडगाव, वासांबे मोहोपाडा, आपटे, चावणे, पंचक्रोशीतील शेतकरी पावसाळी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहे. तसेच परिसरातील सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात.

यंदा भाताचे पीक चांगले आले असल्याने शेतकरी आनंदात आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांची दुबार भातकापणी आणि झोडपणीची काम झाली आहे.

वैरणीचे नुकसान होईल, म्हणून झोडपणीनंतर लगेचच ६०० रुपये शेकडा दराने वैरण विकल्‍याचे शेतकरी खंडू धुरव, वामन दळवी यांनी सांगितले. चारा टंचाईवर मात करण्यासाठी दुग्ध व्यावसायिक आधीच वैरण खरेदी करतात.

शेतातच सहाशे रुपये शेकड्याने वैरण खरेदी केली, तर घरी जाईपर्यंत हमाली, वाहतूक भाडे आदी खर्च पकडून ८०० ते ९०० नऊशे रुपये शेकडा पडत असल्‍याचे दुग्ध व्यावसायिक कोकरे यांनी सांगितले.

पाऊस पडल्यावर रानात चारा तयार होत नाही, तोपर्यंत जनवरांना वैरण किंवा इतर खाद्य द्यावे लागते, त्यामुळे वैरणीचा साठा करावा लागतो. यंदा खरिपाच्या हंगामात चारा खरेदी करून ठेवला आहे.
दत्तात्रेय पाटील, पानशील, दुग्ध व्यवसायिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vasantrao Naik: पहिले शेतकरी मुख्यमंत्री

Orchard Nutrient Management : फळपिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

Agriculture PhD Education: अधिछात्रवृत्तीअभावी कृषी संशोधन धोक्यात

Onion Storage Shed : कांदा चाळीने सोडविली साठवणुकीसह दरांची समस्या

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट ठरले आश्‍वासक

SCROLL FOR NEXT