Department Of Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Recruitment : कृषी अधिकाऱ्यांची रखडलेली भरती होणार

Agriculture Recruitment Update : राज्याच्या कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भात दाखल झालेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या ४१७ उमेदवारांची भरती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भात दाखल झालेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या ४१७ उमेदवारांची भरती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की भरतीसंदर्भात अडचणीच्या ठरणाऱ्या याचिका न्यायालयात गेल्या होत्या. परंतु, आता न्यायालयाच्या भूमिकेतील अडथळे दूर झाले आहे. न्यायालयाचे निकाल हाती येताच तसेच राज्य शासनाकडून योग्य सूचना प्राप्त होताच भरतीची अंतिम प्रक्रिया पार पडू शकते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ४१७ उमेदवारांची निवड कृषी अधिकाऱ्यांच्या विविध संवर्गासाठी केली होती. परंतु, रखडलेल्या भरतीचा तिढा सुटण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचेही प्रयत्न सुरू होते.

भरतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्याच्या कृषी विभागात उपसंचालक (गट अ), तालुका कृषी अधिकारी (गट ब) व मंडळ कृषी अधिकारी (गट ब कनिष्ठ) या पदांवर नवे अधिकारी नियुक्त होतील. भरतीची प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडल्यामुळे उमेदवार हैराण झाले होते. काही जणांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी खासगी कंपन्यांमध्ये सेवा स्वीकारली. ही समस्या कृषिमंत्र्यांच्या कानावर जाताच त्यांनी न्यायालयीन प्रकरणाचा निपटारा होण्यासाठी प्रयत्न केले.

कृषी विभागाच्या सेवेत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया मी स्वतः लक्ष दिले होते. मात्र, न्यायालयाने स्थगितीमुळे नियुक्त्या रखडल्या. त्यानंतर या प्रकरणाचा मी पुन्हा वैयक्तिक पाठपुरावा केला. न्यायालयात वरिष्ठ वकील दिल्यानंतर प्रयत्नांना यश आले. न्यायालयाने आता दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे या उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया अंतिम करण्याच्या सूचना मी कृषी विभागाला दिल्या आहेत.
धनंजय मुंडे, कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT