Agriculture Department Recruitment : ‘कृषी’च्या परिक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना मिळेना नियुक्‍ती

MPSC Agriculture Exam Update : राज्य लोकसेवा आयोगामार्फत उत्तीर्ण झालेल्या कृषी खात्यातील २०३ उमेदवारांना गेल्या सहा महिन्यांपासून नियुक्‍तीच दिली जात नसल्याने त्यांच्यावर रोजगारासाठी शेतीसह इतर ठिकाणी राबण्याची वेळ आली आहे.
Mpsc Exam
Mpsc ExamAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : राज्य लोकसेवा आयोगामार्फत उत्तीर्ण झालेल्या कृषी खात्यातील २०३ उमेदवारांना गेल्या सहा महिन्यांपासून नियुक्‍तीच दिली जात नसल्याने त्यांच्यावर रोजगारासाठी शेतीसह इतर ठिकाणी राबण्याची वेळ आली आहे. संयम सुटत असल्याने या उमेदवारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी कष्टाने राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण केली. २०३ उमेदवार परिक्षेअंती निवडीस पात्र ठरले. यातील उमेदवारांची नियुक्‍ती ही कृषी उपसंचालक तसेच, मंडळ व तालुका कृषी अधिकारी पदावर करण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागात मोठा अनुशेष असल्याने त्यांना नियुक्‍ती देणे सहज शक्‍य आहे.

Mpsc Exam
Agriculture Scholarship Exam : 'डॉ. शरदचंद्र पवार कृषी'च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

विशेष म्हणजे १७ ऑगस्ट रोजी या सर्वांच्या दस्तऐवजांची पडताळणीही करण्यात आली. परंतु त्यानंतरही नियुक्‍तीस टाळाटाळ होत असल्याने या उमेदवारांनी साशंकता व्यक्‍त केली आहे. उत्तीर्ण उमेदवारांपैकी बहुतांश हे गरीब कुटुंबातील आहेत.

Mpsc Exam
MPSC Maratha Candidate : एमपीएससी उत्तीर्ण मराठा उमेदवारांवर अन्याय

त्यांच्या कुटुंबीयांनी पोटाला चिमटा देत त्यांच्या शिकवणी, पुस्तके आणि शहरात राहण्यावरील खर्च केला. मुलांनी देखील पालकांच्या विश्‍वासाला सार्थकी लावत परिक्षा उत्तीर्ण केली. मुले नोकरीवर लागल्याने आता चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा असतानाच नियुक्‍तीच दिली जात नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे.

‘सरकारने निर्णय घ्यावा’

विशेष म्हणजे परिक्षा पास होऊनही नियुक्‍तीस नकार मिळत असल्याने गरीब कुटुंबातील या मुलांवर आता मजुरी व इतर कामावर जाण्याची वेळ सरकारने आणली आहे. परिणामी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com