Farmer ID Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : खानदेशात आठ दिवसांपासून पावसाची दडी

Monsoon Rain Update : खानदेशात पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारली आहे. काही महसूल मंडलांत सात ते आठ दिवसांपासून पाऊस नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारली आहे. काही महसूल मंडलांत सात ते आठ दिवसांपासून पाऊस नाही. यात शेतकरी चिंतेत असून, पिकांची वाढ खुंटू लागली आहे. जळगाव जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा किंचित अधिकचा पाऊस झाला. परंतु काही तालुक्यांत म्हणजेच यावल, रावेर व अमळनेरात जूनमधील पावसाची सरासरीदेखील अपूर्णच होती. जुलैत जळगाव जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडलांत पावसाची तूट आहे.

रावेर तालुक्यातील खानापूर, अमळनेरातील मारवड महसूल मंडलांत पावसाची मोठी तूट आहे. २५ टक्के पाऊसही या मंडळांत झालेला नाही. ८६ पैकी ३८ महसूल मंडलांत पावसाची तूट ५० टक्क्यांपर्यंत आहे. जेथे पाऊस दिसत आहे. तेथेही जोरदार सरी बरसलेल्या नसल्याने अडचण आहे. कारण जमिनीत परेसा ओलावा नाही.

त्यात मागील दोन दिवस कडक ऊन, वारा अशी स्थिती राहिली आहे. थंड, ढगाळ वातावरणात पिके तग धरतात. पण उन्हात ओलावा कमी होतो आणि पिकांची वाढ थांबते, पिके वाळू लागतात. अमळनेरातील पश्चिम भागातील हलक्या, मुरमाड जमिनीत स्थिती नाजूक बनली आहे. ऊन तापत असल्याने या भागातील पिके वाया जातील, अशी स्थिती आहे.

खानदेशात फक्त काळ्या कसदार जमिनीतील पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती बरी आहे. अन्य पिकांना मात्र कमी पावसाचा फटका बसत आहे. मका, सोयाबीन या पिकांना चांगला पाऊस हवा असतो. पण या पिकांसाठी अनुकूल स्थिती नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक भागात मका पिकात तुषार सिंचनाने पाणी देवून पीक वाचविण्याची धडपडही सुरू झाली आहे.

पेरण्यांना उत्साह, आता चिंता

खानदेशात जूनमध्ये पाऊसमान बरे होते. त्यात नंदुरबारात मात्र जूनमध्येही पावसाची तूट होती. अन्य भागात स्थिती बरी होती. परंतु जुलैत अपवाद वगळता जोरदार पाऊस कुठेही झाला नाही. पण तुरळक, मध्यम पाऊस, ढगाळ, थंड वातावरण व ओलावा यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकली.

खानदेशात ९२ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. पेरणी झाली, पण त्यावर जोरदार, चांगला पाऊस नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यात आता ऊन व वारा अशी स्थिती असल्याने सोयाबीन, उडीद, मूग, मका आदी पिकांची स्थिती दिवसागणिक नाजूक बनेल, अशी स्थिती आहे. मुरमाड जमिनीतील पिके दोनच दिवसात हातची जातील, अशी स्थिती तयार झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Corridor Maharashtra : ‘टायगर कॉरिडॉर’च्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

SCROLL FOR NEXT