Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Kharif Sowing : पावसाचा जोर नसल्याने पेरण्या रखडल्या

Monsoon Rain Update : यंदा हवामान विभागाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार काही भागांत थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात माॅन्सूनचे आगमन होऊन आठवडा होत असला तरी अद्याप समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. सुरुवातीच्या हलक्या सरींनंतर पावसाचा जोर वाढत नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. यंदाही पेरणी जुलैपर्यंत जाईल की काय, असे एकूणच चित्र निर्माण होत आहे.

यंदा हवामान विभागाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार काही भागांत थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. परंतु त्यानंतर पावसाने मध्यंतरी पाठ फिरवल्याने शेतजमिनींमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. परिणामी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांची सार्वत्रिक पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. काही मर्यादित क्षेत्रावरच पेरणी झाली.

मेमध्ये यंदा माॅन्सूनपूर्व पाऊस झाला होता. त्यामुळे जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर काही भागांत शेतकऱ्यांनी पहिल्या सरींच्या ओलाव्यावरच पेरण्या धरल्या. मात्र या पेरण्या जोखमीच्या पातळीवर पोचल्या. मध्यम ते हलक्‍या प्रकारच्या जमिनीत पेरणी केलेल्या क्षेत्रांवर जर लवकरच जोरदार पाऊस झाला नाही, तर उगवलेल्या पिकांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.

अकोला, पातूर, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी आदी तालुक्यांत शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात पेरण्या सुरू केल्या असल्या तरी बहुतांश शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. मागील दोन-तीन दिवसांत विभाग बदलून पाऊस होत आहे. शेतकऱ्यांनी बाजारात बियाणे व खतांची आधीच खरेदी केलेली असून पेरणीयोग्य ओलावा मिळताच मोठ्या प्रमाणावर शेतकरी पेरणी करण्यासाठी पुढे येतील, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता योग्य पावसाची वाट पाहावी. जमिनीत पुरेसा ओलावा तयार झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून पिकाची उगवण चांगली होईल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

आजवर झालेली पेरणी

अकोला जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र चार लाख ३२ हजार हेक्टर एवढे असून आजवर ६८ हजार २४२ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीनची लागवड ३८ हजार १३० हेक्टरवर झाली आहे.

यानंतर कपाशीची २१ हजार ३९१ हेक्टरवर लागवड आटोपली होती. इतर पिकांमध्ये तूर ८६०६ हेक्टरवर पेरणी झाली. मूग, उडदाची पेरणी कृषी खात्याच्या अहवालात अद्याप निरंक दिसून येत आहे. जिल्हयात आतापर्यंत ६८२४२ हेक्टरवर झाले आहे. सरासरीच्या एकूण १५.८० टक्के लागवड झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT