Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Savitri River : सावित्री नदीच्या पाणी पातळीत घट

Water Level : पावसाचा जोर कमी झाला असून सावित्री नदीची पाणी पातळीही सोमवारी सकाळी इशारा पातळीच्या खाली आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Team Agrowon

Mahad News : पावसाचा जोर कमी झाला असून सावित्री नदीची पाणी पातळीही सोमवारी सकाळी इशारा पातळीच्या खाली आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. महाड तालुक्यातील सर्व रस्त्यांवर आता वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

तीन दिवसांत महाडमध्ये ४२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील सावित्री, गांधारी व काळ नद्यांनी धोक्याची पातळी गाठली होती. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले होते. रात्रभर नद्यांची पातळी नागरिकांना कळवली जात होती.

गांधारी नदीचे पाणी शहरातील दस्तुरी मार्गावर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक रविवारी बंद करण्यात आली होती. तर महाड-म्हाप्रळ मार्गावरील रावढळ पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूकही थांबली होती. याच मार्गावर गोठे गावाजवळ मोठे झाड उन्मळल्‍याने वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे सहा तासानंतर झाड बाजूला करण्यात आले.

लाडवली पुलाचा पर्यायी मार्ग पाण्याखाली गेलेला होता. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने किंजळघर गावातील अंगणवाडी शेजारी असणारे एक सभागृह कोसळले. सभागृहामध्ये व्यायाम शाळा चालवली जात होती. रात्रीची वेळ असल्याने कोणत्या स्वरूपाची जीवित हानी झाली नाही. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्‍याने पुलांवर आलेले पाणी ओसरल्‍याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT