Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : दुष्काळाच्या दाहकतेतही गाईच्या दूधदरात घट

Dairy Business : दुधाचे पडलेले दर उन्हाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढल्यानंतर सुधारतील, ही दूध उत्पादकांची आशा फोल ठरली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : दुधाचे पडलेले दर उन्हाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढल्यानंतर सुधारतील, ही दूध उत्पादकांची आशा फोल ठरली आहे. उन्हाळा सुरू होऊन दीड महिना लोटला, मात्र दुधाचे दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत. खरेदीदार दूध संघांनी पंधरा दिवसांपासून गाईच्या दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी केले आहेत.

उन्हाळ्यात दूध देण्याचे जनावरांचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले असताना गतवर्षीच्या तुलनेत प्रतिलिटर दुधामागे आठ ते दहा रुपयांचा आर्थिक फटकाही सोसावा लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. सध्या राज्यात दूध उत्पादकांना दररोज एकूण २० ते २५ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.

राज्यात दररोज साधारणपणे सव्वादोन कोटी लिटरच्या जवळपास दुधाचे संकलन होते. साधारण पाच लाख शेतकरी या व्यवसायावर अवलंबून आहेत. नगर, पुणे, सोलापूर, मराठवाडा, कोल्हापूर, सांगली, सातारा, विदर्भातील काही भागांत दूध व्यवसायाचे प्रमाण अधिक आहे. राज्यात साधारण सहा वर्षांपासून दूध व्यवसाय सातत्याने अडचणीत येत असून, अलीकडच्या दोन वर्षांत अधिक नुकसान उत्पादकांना सोसावे लागले आहे.

वर्षभरापूर्वी गाईच्या दुधाला ३८ रुपयांपर्यंत दर होता. दोन ते तीन महिने हा दर टिकल्यानंतर दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी झाल्याचे सांगत दूध खरेदीदार संघांनी दुधाचे दर कमी करायला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने दर कमी करत सात ते आठ महिन्यांत दर थेट २८ रुपयांवर आणले. ओरड झाल्यावर प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले.

१० जानेवारी ते १० मार्च असे दोन महिने ही योजना राबविली. त्यातही ३.५ फॅट व ८.५ ‘एसएनएफ’ला २७ रुपये दर मिळाला तर अनुदान मिळेल अशी अट घातली. त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यात योजनेला मुदतवाढ मिळाली नसल्याने योजना गुंडाळल्यात जमा आहे. सध्या घसरत्या दरामुळे ऐन उन्हाळ्यात फायदा होण्याऐवजी राज्यातील दूध उत्पादकांना दररोज २० ते २५ कोटींचा तोटा सोसावा लागत आहे.

दुष्काळाशी दोन हात

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. चाऱ्यासाठी वापरात असलेल्या उसासह ओल्या मक्याच्या दरात गेल्या दोन महिन्यांत प्रतिटनाला ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.

कडबा प्रति शेकडा ५०० रुपयांनी वाढला आहे. एकेकाळी फेकून दिला जाणारा गव्हाचा भुसा आता आठ हजार रुपये टनांनी विकला जातो आहे. सध्या दूध उत्पादक दुष्काळाशी दोन हात करीत पशुधन जगवीत आहेत. दूध उत्पादन सरासरी वीस टक्के घटले आहे. अशा स्थितीत दुधाचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे दुष्काळाशी सामना करणारे उत्पादक कमी दरामुळे मात्र जेरीस आले आहेत.

सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. चारा, पाणीटंचाई, पशुखाद्याचे वाढते दर आणि दूध उत्पादनात घट यामुळे उन्हाळ्यात दूध व्यवसाय जपणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच संघाकडून दुधाचे दर वरचेवर कमी केले जात आहेत. माझा दररोज ५०० रुपयांचा तोटा होत आहे. शासनाचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष आहे.
- योगेश सोनवणे, दूध उत्पादक, निंभेरे, ता. राहुरी, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: ‘एचटीबीटी’ कापसावरील बंदी उठविली जाणार?

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत बदल अशक्य : कोकाटे

Nagpur Market Scam: नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT