Betel Leaf Agrowon
ॲग्रो विशेष

Betel Leaves Market : खाऊच्या पानांच्या मागणीसह दरात घट ; पान उत्पादक चिंतेत

Betel Leaf Rate : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बाजारात पानांची मागणी घटले आहेत. त्यामुळे दरांमध्येही तब्बल ३० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे पान उत्पादकांमध्ये चिंता आहे

Team Agrowon

Betel Leaf Farming : गेल्या महिन्यात बाजारात खाऊच्या पानांची मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली होती. परंतु पंधरा दिवसांपूर्वी बाजारात पानांची मागणी घटून दर तब्बल ३० टक्क्यांनी घटले आहेत. त्यामुळे पान उत्पादकांमध्ये चिंता आहे. सध्या श्रावण आणि गणपती सणाच्या पार्श्‍वभूमीवर दर वाढतील, अशी शक्यता पान उत्पादकांनी वर्तवली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात पानमळ्यांची उतरण झाल्यानंतर उन्हाळी पाऊस झाला नाही. त्यातच मॉन्सूनचा पाऊस झाला. पण हा पाऊस पुरेसा नसल्याने पान उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. परिणामी, कमी पाऊस असल्याने पानांचा अपेक्षित फुटवा मिळाला नसल्याने उत्पादनात घट झाली.

जूनपासून नव्या पानांचा खुडा सुरू झाला होता. दरम्यान, या काळात बाजारात पानांची आवक कमी असल्याने मागणी वाढली होती. त्यामुळे दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली होती. जुलैच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात फाफडाला ४००० ते १२ हजार रुपये, कळी पानाला २००० ते ८००० रुपये (एक डाग) दर मिळाला.

या भागातील खाऊची पाने पंढरपूर, सोलापूर, कोकणासह अन्य ठिकाणी विक्री होतात. पावसाने पानांची मागणी कमी झाल्याने उठावही कमी झाला. यामुळे पानांच्या दरात हळूहळू पानांचे दर कमी होऊ लागले. सध्या बाजारात पानांची मागणी कमी असून, फाफडा पानाला ३००० ते ५०००, तर कळी पानाला २००० ते ३५०० रुपये (एक डाग) दर मिळत आहे.

श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात सध्यातरी पानांच्या मागणीत वाढ झालेली नाही. परंतु येत्या काही दिवसांत मागणीत वाढ होईल. त्यातच गणपती उत्सवात पानांना अधिक मागणी असते. त्यामुळे श्रावण आणि गणपती सणाच्या पार्श्‍वभूमीवर दर वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

गेल्या महिन्यात पानांच्या दरात वाढ झाली होती. परंतु ही दरवाढ फार काळ टिकली नाही. बाजारात मागणी कमी झाल्याने दर कमी झाले आहेत. श्रावण, गणपती सणाच्या पार्श्‍वभूमीवर दर वाढतील, अशी आशा आहे.
भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक, नरवाड, ता. मिरज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT