Team Agrowon
स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर अनेकांना पान खायची सवय असते. त्यातही बनारस पानाचे तर अनेकजण शौकिन असतात.
पण अनेकांचा असा समज असा आहे की, खाण्याच्या बनारस पानाची शेती ही वाराणसीमध्ये होते.
खरं तर बनारस पानासाठी वापरण्यात येणाऱ्या पानाची शेती प्रामुख्याने बिहारमध्ये केली जाते. बिहारमधील गया, औरंगाबाद, नवादा आणि नालंदामध्ये या पानांची शेती केली जाते.
बनारस पानामध्ये वापरल्या जाणाऱ्या पानाला मघई पान म्हणतात. केंद्र सरकारकडून मघई पानाच्या जातीला जीआय टॅगही देण्यात आला आहे.
मघई पानाच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकारच्या विशेष फलोत्पादन योजनेंतर्गत ५० टक्के अनुदान दिले जाते.
मघई पानाच्या शेतीसाठी हेक्टरी साधारणपणे ७० हजार रुपये उत्पादन खर्च लागतो.
परिणामी मघई पान शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बिहार सरकार ३२ हजार रुपये अनुदान देते.