Rohit pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा ; रोहित पवारांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांची भेट घेऊन संपूर्ण मराठवाड्या दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

Swapnil Shinde

Marathwada News : यंदा मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यात पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. तरी राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रोहित पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा मराठवाड्यात कमी पाऊस पडला. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला. तर रब्बी हंगामात कोणत्याही प्रकारचे पेरणी करता येणार नाही. मराठवाड्यातील ७६ पैकी ६० तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असूनही केवळ १४ तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची पातळी खालवली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आठही जिल्ह्यात पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे.

तसेच मागील वर्षीच्या अतिवृष्टीचं जाहीर केलेलं हेक्टरी १३ हजार रुपयांचं अनुदानही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोचलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि मागील वर्षीच्या अतिवृष्टीचं अनुदान व पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत

Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात

NAFED Onion Scam : कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार कमबॅक

Kharif Sowing : सोयाबीन, सूर्यफूल क्षेत्रात घट

SCROLL FOR NEXT