Sugarcane Harvester Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvester Subsidy : 'ऊस तोडणी यंत्रास सबसिडी देण्याचा निर्णय लवकरच'

Ajit Pawar : ऊस तोडणी यंत्राला सबसिडी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

sandeep Shirguppe

Sugarcane Harvester Subsidy : 'ऊसतोडणी मजुरांचा अभाव लक्षात घेता ऊस उत्पादकांनी ऊस तोडणी यंत्राचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे तोडणी यंत्राला सबसिडी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते काल (ता.२९) कोल्हापूर येथे भीमा कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमानिमीत्त बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे चांगले मार्केट, त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यांना होणे आणि त्यांना नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञानाची माहिती करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात कृषी प्रदर्शन भरावीत.

यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना होईल', असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केला.

येथील मेरी वेदर मैदानावरील भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचा समारोप आणि पुरस्कार वितरणाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, तर पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील प्रमुख उपस्थित होते.

पर्यावरणपूरक जॅकेट

या कार्यक्रमात रिलायन्स पॉलिमर्सचे सत्याजित भोसले यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना पेट बॉटल्सपासून बनविलेले पर्यावरणपूरक जैकेट भेट दिले. पवार यांनी अंगातील पूर्वीचे जॅकेट काढून ते नवीन जॅकेट घातले, मात्र, ते आकाराने कमी असल्याचे सांगताच व्यासपीठावर हास्य फुलले.

तुडुंब गर्दीत प्रदर्शनाचा समारोप, चार दिवसांत १८ कोटींची उलाढाल

शेतकरी, नागरिकांच्या तुडुंब गर्दीत आज भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचा समारोप झाला. चार दिवसांच्या या प्रदर्शनात सुमारे १८ कोटींची उलाढाल झाली. तब्बल साडेपाच लाख जणांनी प्रदर्शनाला भेट दिली. महिला बचत गटांच्या स्टॉलद्वारे ५५ लाखांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT