Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate: कृषिमंत्री कोकाटेंबाबत आज निर्णय होणे शक्य

Rummy Controversy: वादग्रस्त वक्तव्ये आणि विधानपरिषदेत रमी खेळल्यावरून संकटात आलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा फैसला मंगळवारी (ता. २९) होणार आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : वादग्रस्त वक्तव्ये आणि विधानपरिषदेत रमी खेळल्यावरून संकटात आलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा फैसला मंगळवारी (ता. २९) होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सोमवारी (ता. २८) होणारी भेट टळली असून मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीआधी ही भेट होणार असल्याचे सांगण्यात आले.

सभागृहात कामकाजावेळी रमी खेळण्याच्या प्रकारानंतर अडचणीत आलेल्या कृषिमंत्री कोकाटे यांच्याशी सोमवारी चर्चा करून मंगळवारी निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले होते.

कोकाटे हे सोमवारी सकाळीच मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या खासगी निवासस्थानी होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता, उपमुख्यमंत्री पवार आणि माझी भेट उद्या (ता. २९) होईल. त्या वेळी चर्चेत माझी बाजू मांडेन, असे त्यांनी सांगितले.

कोकाटे यांचे खाते बदलण्याच्या चर्चा आहेत. मात्र, त्यांचा राजीनामा घेतला किंवा खाते बदलल्यास आमदार रोहित पवार यांना त्याचे श्रेय जाईल. शिवाय धनंजय मुंडे यांच्या रूपाने एक राजीनामा पक्षाच्या नावावर असल्याने दुसरा नको असाही एक मतप्रवाह आहे.

कोकाटे यांच्याकडे मदत व पुनर्वसन खाते तर त्या विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खाते देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT