Lumpy Skin Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy skin : ‘लम्पी स्कीन’ बाधित ४६२ जनावरांचा मृत्यू

Lumpy Skin Update : परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता. ९) पर्यंत एकूण ४ हजार ३२२ जनावरांना लम्पी स्कीन आजार प्रादुर्भाव झाला आहे.

Team Agrowon

Parbhani Lumpy Skin Update : परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता. ९) पर्यंत एकूण ४ हजार ३२२ जनावरांना लम्पी स्कीन आजार प्रादुर्भाव झाला आहे. उपचारानंतर ३ हजार ५४१ जनावरे बरी झाली आहेत. परंतु या आजारामुळे आजवर एकूण ४६२ जनावरांचा मृत्यू झाला.

त्यात वासरे २७६, बैल १२९, गायी ५५ या जनावरांचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजाराने सक्रिय असलेल्या जनावरांची संख्या ३१९ होती. त्यापैकी १२५ जनावरांची प्रकृती गंभीर होती, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील एकूण जनावरांची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती.त्यात १ लाख ३७ हजार १५० गायवर्गीय, १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय आणि ९८ हजार ४९५ म्हैस वर्गीय जनावरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १४४ ईपी सेंटरच्या ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या ६२६ आहे.

बाधित गावांपासून ५ किलोमीटर परिघातील जनावरांची संख्या २ लाख ८० हजार ३९७ आहे. आजवर जिल्ह्यातील १ लाख गाय वर्गीय आणि १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय असे एकूण २ लाख ९९ हजार ८६१ जनावरांच्या लसीकरणासाठी २ लाख ९९ हजार ३०० लसी प्राप्त झाल्या होत्या. गोशाळांतील ३ हजार ९९५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात गोवर्गात केलेले स्वच्छ लसीकरण २८ हजार ९ आहे. मंगळवार (ता. ९) पर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ९१६ गायवर्गीय व १ लाख ५२ हजार ८६९ बैलवर्गीय व ५ हजार वासरे असे एकूण २ लाख ९७ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Price Hike: तांदळाचे भाव वाढले; केंद्र सरकार अॅक्शन मोडवर

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिलासा, प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा

Rajhans Dudh Sangh Election : संगमनेर तालुका सहकारी दूध संघाची धुरा रमेश गुंजाळ यांच्या खांद्यावर; दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत

Modern Farming Tips : "आपल्या शेतीत आपल्यालाच बदल करावा लागेल!" कृषी तज्ज्ञ डॉ. कौसडीकर यांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

Guava Farming Training: पेरू उत्पादनाला आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड हवी

SCROLL FOR NEXT