Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेवटची मुदत! रब्बी हंगामातील पिकांसाठी दोनच दिवस पोर्टल सुरू राहणार

Pik Vima : रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा भरण्याची अंतिम मुदत ता. ४ व ५ डिसेंबर भरता येणार आहे.

Swapnil Shinde

Rabi Season Crop Insurance : राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात असताना दिलासा देण्यासाठी शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने रब्बी हंगामात १ रुपयात पीक विमा योजना सुरु केली आहे. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबर २०२३ होती. पण काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकले नव्हते. म्हणून शासनाने रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा भरण्याची मुदत वाढली आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा ता. ४ व ५ डिसेंबर २०२३ रोजी भरता येणार आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शासनाने हवामानावर आधारित फळपिक योजना सुरु केली आहे. या अंतर्गत आंबा, काजू, केळी या फळ पिकांचा समावेश आहे. त्यांची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर होती. पण पिक विमा पोर्टलमधील काही तांत्रिक अडचणींमुळे या योजनेत या योजनेत सहभागी होऊ शकले नव्हते. म्हणून राज्य शासनाने केंद्राकडे मुदत वाढविण्याची विनंती केली होती. त्यानुसार केंद्राने दोन अतिरिक्त दिवस (४ व ५ डिसेंबर) पिक विमा पोर्टल या पिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे.

रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर होती, मात्र काही शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा भरू शकले नाहीत, याचा विचार करून केंद्राकडे विनंती केली असता, दि. ४ व ५ डिसेंबर या दोन दिवसात वरील पिकांचा विमा भरता येणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT