Solapur DCC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur DCC Bank : ‘डीसीसी’ला महिनाअखेर नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

Co-Operative Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. रिक्त झालेल्या जागेवर जुलै अखेरपर्यंत नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिळण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. रिक्त झालेल्या जागेवर जुलै अखेरपर्यंत नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिळण्याची शक्यता आहे. बँकेनेही त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांची नियुक्ती तत्काळ रद्द करावी या संदर्भात सहकार विभागाने आदेश दिल्यानंतर जिल्हा बँकेच्या वतीने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती.

नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी निवडण्यासाठी सहकार विभागातील अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली होती. त्यामध्ये निवृत्त अपर निबंधक धनंजय डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती.

या समितीमध्ये विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, नाबार्डचे निवृत्त अधिकारी सुखटणकर व लेखापरीक्षक अमोल जगताप यांचा या समितीमध्ये समावेश होता. या पदासाठी अर्ज केलेल्या व पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती या समितीने घेतल्या होत्या.

या मुलाखतीमधून राजेंद्र शिंदे यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी शिफारस केली होती. राजेंद्र शिंदे यांच्या नियुक्तीसाठी जिल्हा बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घेणे आवश्यक आहे. नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT