Solar Pump Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Day-Time Electricity : सौर ऊर्जेतून शेतीपंपांना दिवसा वीज मिळणार

Solar Power Project : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा-२’ आणि महानिर्मिती योजनेतून शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यभर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत.

Team Agrowon

Sangli News : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व खात्रीचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि ‘महानिर्मिती’कडून आटपाडी तालुक्यात चार गावांत पाच ठिकाणी तब्बल ३४ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यातून साडेसहा हजार शेतकऱ्यांना दिवसा पंपासाठी वीज उपलब्ध होणार आहे. अन्य तीन ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जागा घेतल्या आहेत.

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा-२’ आणि महानिर्मिती योजनेतून शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यभर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत. यातूनच आटपाडी तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून माडगूळ येथे वीस एकरांत पाच मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पन्नास टक्के झाले आहे.

त्याची वीज आटपाडी उपकेंद्राला जोडली जाणार आहे. लिंगीवरे येथे एकोणीस एकरांत चार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पळसखेलमध्ये दोन ठिकाणी काम सुरू आहे. एका ठिकाणी ४५ एकरांत नऊ मेगावॉट आणि दुसऱ्या ठिकाणी २७ एकरांत सहा मेगावॉटचे काम सुरू आहे.

येथे तयार होणारी वीज पुजारवाडी, लिंगीवरे येथील उपकेंद्रांना जोडली जाणार आहे. ‘महानिर्मिती’कडून करगणी येथे ४५ एकरांवर नऊ मेगावॉट प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. याची वीज करगणी उपकेंद्राला जोडली जाणार आहे. त्यानंतर वीजवाहक तारा जोडून उपकेंद्रांना जोडल्या जाणार आहेत. शेटफळे, झरे, खरसुंडी येथे प्रकल्प उभारणीसाठी जागा ताब्यात घेतल्या आहेत. तेथे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून कामे सुरू होतील.

तीन महिन्यांत वीज उपलब्ध होणार

सध्या आटपाडी तालुक्यात चार गावांत पाच ठिकाणी ३४ मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. त्याची तीन महिन्यांत वीज उपलब्ध होईल. ही वीज शेतीपंपासाठी दिवसा वापरली जाणार आहे. यातून पाच अश्‍वशक्तीचे सहा हजार पाचशे विद्युत पंप चालणार आहेत. शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

चार गावांत ३४ मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पाची कामे वेगात सुरू आहेत. त्याची वीज लवकरच उपलब्ध होईल. ती दिवसा शेतीपंपांना मिळणार आहे.
- संजय बालटे, उपअभियंता, महावितरण, आटपाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT