Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Day-Time Electricity : सांगली, कोल्हापुरातील ३४ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

Agriculture Solar Scheme : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Sangli / Kolhapur News : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात ९ तर सांगली जिल्ह्यात ११ प्रकल्प सुरु झाले आहेत.

या प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता १०२ मेगावॅट झाली असून एका वर्षात दोन्ही जिल्ह्यातील ३४ हजार १६१ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे, अशी माहिी महावितरणाच्या सूत्रांनी दिली.

कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे.

सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हे २० प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २९ कृषी वाहिन्यांवरील (फिडरवरील) तर सांगली जिल्ह्यातील ३९ कृषी वाहिन्यांवरील (फिडरवरील) शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती...

कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता १७० मेगावॅट आहे. यापैकी नऊ प्रकल्प कार्यान्वित झाले असून यांची एकत्रित क्षमता ३२ मेगावॅट आहे. यामध्ये हरोली (३ मेगावॅट-१२३६ शेतकरी), आळते (४ मेगावॅट-१९२८ शेतकरी), सातवे (४ मेगावॅट-१२७० शेतकरी), किणी (२ मेगावॅट -१२१७ शेतकरी), हरळी बुद्रुक (३ मेगावॅट -१५५० शेतकरी), नरंदे-तासगाव (७ मेगावॅट- ३३२७ शेतकरी), कोळगाव (२ मेगावॅट- १०२६ शेतकरी), दुंडगे (७ मेगावॅट-१५८१ शेतकरी) या प्रकल्पांचा समावेश होतो. या प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील १३ हजार १३५ शेतकऱ्यांना शेतीकरता दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT