DAP Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

DAP Fertilizer : सोयाबीनसाठी डीएपीचा आग्रह धरू नये

Soybean Farming : जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनसाठी डीएपी खतांची मागणी करत आहेत. परंतु डीएपी खतातून सोयाबीन पिकासाठी आवश्यक सर्व मूलद्रव्ये उपलब्ध होत नाहीत.

Team Agrowon

Hingoli News : जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनसाठी डीएपी खतांची मागणी करत आहेत. परंतु डीएपी खतातून सोयाबीन पिकासाठी आवश्यक सर्व मूलद्रव्ये उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी डीएपी खताचा आग्रह धरू नये. इतर ग्रेडच्या पर्यायी खतांचा वापर करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एकूण खरीप पिकाच्या जवळपास ७२ टक्के क्षेत्र सोयाबीन पिकाखाली येते.त्या खालोखाल तूर, हळद, कपाशी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यामध्ये यंदाच्या मे अखेर १६ हजार ९०० टन खतांचे आवंटन शासनाकडून मंजूर असून, आतापर्यंत १६ हजार २७ टन खत उपलब्ध झाले आहे.

म्हणजे जवळपास ९५ टक्के खत पुरवठा झालेला असून आगामी आठ दिवसात आणखी खत उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यात एकूण खताचा विचार केल्यास खताचा तुटवडा नाही. तथापि, सोयाबीन उत्पादक शेतकरी डीएपी खताचा आग्रह धरत आहेत. सोयाबीन पिकासाठी प्रतिहेक्टरी ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश या व्यतिरिक्त २० किलो गंधकाची आवश्यकता असते.

परंतु डीएपी खतामधून १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद हे दोनच मूलद्रव्य उपलब्ध होतात. त्यामधून सोयाबीन या पिकाला लागणारी सर्व मूलद्रव्ये उपलब्ध होत नाहीत म्हणून त्याकरिता पर्यायी खताचा वापर करावा.त्यामध्ये विशेषत: २०ः२०ः०ः१३ अधिक पोटॅश (एमओपी), १२:३२:१६, १४:३५:१४ आदी ग्रेडच्या खतांचा उपयोग केल्यास सोयाबीन पिकाची मूलद्रव्याची गरज भागते.

तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकासाठी डीएपी खत उपयुक्त आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीतील माती परीक्षण करून खताचा वापर करावा. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादन वाढण्यास मदत होते. त्यामुळे सोयाबीन पिकासाठी डीएपी खताचा आग्रह धरू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT